एकदा सगळ्या तिथींचं भांडण झालं

एकदा सगळ्या तिथींचं भांडण झालं. चतुर्थी म्हणाली मी गणपतीची म्हणून मी मोठी. एकादशी म्हणाली मी विठोबाची मी मोठी. पौर्णिमा म्हणाली मी पूर्ण चंद्राची तिथी म्हणून मी मोठी.
 
सगळ्यांचं भांडण ब्रह्मदेवाने सोडवलं. प्रत्येक तिथीला महत्वाचं स्थान देऊन.
 
बलिप्रतिपदा 
 
यमद्वितीया 
 
अक्षयतृतीया 
 
गणेश चतुर्थी
 
नागपंचमी 
 
चंपाषष्ठी
 
रथसप्तमी
 
गोकुळाष्टमी
 
रामनवमी
 
विजयादशमी
 
आषाढी एकादशी
 
वामन द्वादशी
 
धनत्रयोदशी
 
नरकचतुर्दशी
 
नारळी पौर्णिमा
 
दिव्यांची आमावस्या 
 
प्रत्येक तिथीला आनंद झाला ....तसे हे तिथींचे शुभदिन आपल्या जीवनात आनंद घेऊन येवोत. आज दिव्यांच्या अमावास्येच्या निमित्ताने आजी ची गोष्ट आठवली....!

वेबदुनिया वर वाचा