इंडियन प्रीमीयर लीगची (आयपीएल) ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा 18 एप्रिलपासून भारतात सुरू होत असून या स्पर्धेमुळे क्रिकेट जगतात आणखी एका 'क्रिकेट युद्धाला' प्रारंभ होणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएलची ही स्पर्धा निश्चितच एका नवीन क्रिकेट क्रांतीची नांदी असेल. या झुंजीत प्रत्येक संघाला प्रशिक्षत करणारे प्रशिक्षक कोण आहे, यावरही बरेच काही ठरणार आहे. त्यामुळे हे 'कोच' कोण आणि त्याची बलस्थाने काय आहेत ते जाणून घेऊया.