* गोड, उष्ण, कफवातनाशक गुणधर्माची बडीशेप सुगंधी, रुचकर आहे.
* भोजनानंतर चिमूटभर बडीशेप तशीच किंवा विड्यात मिसळून खायची अनेक ठिकाणी पद्धत आहे.
* कोरडा खोकला किंवा तोंड आलं असेल तर बडीशेप चावून तोंडात धरावी.
* उन्हामुळे डोके दुखत असेल तर बडीशेप वाटून डोक्यावर त्याचा लेप लावावा.
* बडीशेप खाल्ल्याने पोटातील मुरडा कमी होतो.
* लहान मुलांना पोटदुखी, पोटफुगी, पातळ शौचास होत असेल तर बडीशेप भिजवलेले पाणी प्यावे.
* बडीशेपपासून काढलेले तेल औषधात वापरतात.
* तापातून उठलेल्या पेशंटच्या तोंडाला चव नसणं, अन्नावरची वासना उडणंया तक्रारी असतात. त्यांना बडीशेप वरचे वर कोमट पाण्यासह खायला द्यावी. भूक लागते.