दरवर्षी लाखो लोक डासांमुळे होणाऱ्या आजारामुळे मरण पावतात. डास चावल्यामुळे मलेरिया, डेंगू आणि चिकनगुनिया सारखे आजार उद्भवतात. म्हणून डास वाढू नये त्यासाठी आपल्या सभोवतालीचे वातावरण स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. डास चावल्यानंतर होणारी खाज देखील आपल्याला त्रास देते. झोपताना डास चावल्यानंतर झोपच उडून जाते. डासांना घालविण्यासाठी तसे तर बरेच प्रकारचे स्प्रे, उदबत्त्या, इलेक्ट्रिक बॅट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. परंतु डासांना घालवण्यासाठी काही घरघुती उपाय देखील आहे जे हर्बल आणि नैसर्गिक असल्याने काहीही त्रास होत नाही.
1 कडुलिंबाचे तेल -
कडुलिंबाचे तेल डासांना घालवण्यासाठी प्रभावी आहे. एका अध्यनानुसार, नारळाच्या तेलात आणि कडुलिंबाच्या तेलाला समप्रमाणात मिसळून आपल्या शरीरास लावल्याने डास जवळ येणार नाही अँटीफंगल, अँटीवायरल आणि अँटी बॅक्टेरियलच्या गुणधर्माने समृद्ध असलेल्या या कडुलिंबाच्या वासाने डास दूर पळतात.