व्हिटॅमिन डी किंवा बी-१२ची कमतरता हेदेखील थकव्यामागचे एक मोठे कारण आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाशात फिरण्याचा उपाय अवलंबता येतो. व्हिटॅमिन बीची कमतरता कमी करण्यासाठी सुकामेवा, अंडी, चिकन तथा पनीरचं सेवन वाढवायला हवं.
सालमन माशाचं सेवनही यासाठी परिणामकारक आहे. टॉन्सिल्सचा त्रास असेल, निद्रानाशाचा त्रास असेल, सततच्या सर्दीमुळे नाक बंद राहण्याचा त्रास होत असेल तरी थकवा जाणवतो.