Tips For Diabetes Patients सणासुदीच्या काळात शुगल लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टिप्स

सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (14:58 IST)
सण-उत्सवांच्या दरम्यान मधुमेही रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गोड पदार्थ त्यांच्यासाठी खूप घातक ठरू शकतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही या सणासुदीच्या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया -
 
डार्क चॉकलेट खा
या सणासुदीच्या काळात तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर गोड पदार्थात डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. मिल्क चॉकलेट ऐवजी डार्क चॉकलेटचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये साखरेचे प्रमाण खूपच कमी असते, ज्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
 
खूप पाणी प्या
मधुमेहाच्या रुग्णाने जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहतात आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित राहण्यास मदत होते.
 
बेकरीचे पदार्थ अजिबात खाऊ नका
या सणासुदीच्या काळात बेकरी उत्पादनांचे सेवन अजिबात करू नका. या उत्पादनांच्या सेवनाने शरीरातील साखरेची पातळी वाढते. यासोबतच यामध्ये चरबीचे प्रमाणही जास्त असते जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. यासोबतच तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नका.
 
सुका मेवा खा
दिवाळीच्या या मोसमात लोक एकमेकांना सुका मेवा भेट देतात. अशा परिस्थितीत तुम्ही मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. आरोग्यासोबतच ते रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती