Monsoon Health Tips :यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन,कारणे,लक्षणे आणि उपचार

बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (13:36 IST)
यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे यूटीआय हे कोणाला देखील होऊ शकत.नवजात आणि 5 ते 6 वयोगटाच्या मुलांना देखील याचा धोका होऊ शकतो.पण हा आजार सर्वाधिक महिलांना होतो.पावसाळ्यात हा त्रास सर्वाधिक उद्भवतो. हवामानाच्या आद्रतेमुळे संसर्गाचा धोका जास्त असतो.हा धोका योनी क्षेत्रात अधिक असतो.या बद्दलची माहिती महिलांना असणं आवश्यक आहे. चला तर मग यूटीआय ची लक्षणे,कारणे,आणि उपचाराची माहिती जाणून घेऊ या.
 
यूटीआय म्हणजे काय?
 
हा आजार जगातील सुमारे 70 टक्के स्त्रियांना कधी न कधी अवश्य होतो.स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हा त्रास वाढतो.या आजाराचे मुख्य कारण आहे लघवी ला रोखणे.असं केल्याने संसर्ग आतल्याआतच किडनीत पसरतो. तसेच कमोडच्या घाणेरड्या टॉयलेट सीट वर बसणे.या मुळे कोणत्याही वयोगटातील महिलांना इन्फेक्शन होऊ शकतो.
 
यूटीआय ची लक्षणे-
 
* यूरीन किंवा लघवी करताना जळजळ होणं.याचे आणखी एक प्रमुख कारण आहे शरीरात पाण्याची कमतरता असणं.
 
* यूरीन करताना तीव्र टोचणे आणि जळजळ होणं.
 
 * यूटीआय चे प्रमुख कारण यूरीनसाठी जोरात दाब बनतो आणि काहीच थेंबा यूरीन येत.
 
* गढूळ रंगाची यूरीन होते.
 
* रुग्णाला जास्त थकवा,अशक्तपणा,थंडी वाजून ताप येतो.
 
उपचार-
 
1 पाणी भरपूर प्यावं -पाण्याचा कमतरतेमुळे अनेक आजार होतात.या साठी पाणी भरपूर प्यावे जेणे करून आपण निरोगी राहाल.
 
2 क्रेनबेरीचा रस प्यायल्यानं यूटीआयच्या संसर्गापासून आराम मिळेल आणि जळजळ देखील कमी होईल.
 
3 नारळाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.नारळाचं पाणी पोटाची जळजळ,पाण्याची कमतरतेला पूर्ण करत.
 
4 लसणात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.याचा सेवनाने संसर्गात आराम मिळेल.लसणाची तासीर उष्ण असते.डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करावे.
 
5 धणेपूड ची प्रकृती थंड असते.आपण दररोज दूधात धणेपूड मिसळून उकळवून घ्या आणि दररोज 1 ग्लास प्यावं.या व्यतिरिक्त धणे आणि आवळापूड समप्रमाणात रात्री भिजत घाला आणि सकाळी हे पाणी गाळून पिऊन घ्या.लगेचच आराम मिळेल.  
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती