कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठून कोमट पिण्याचा सल्ला तर आपण अनेकांकडून ऐकला असेलच. कोमट पाण्यात सर्व शारीरिक कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याची क्षमता असते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायद्याचे आहे. झोपताना अनेक लोक पाणी पिणे टाळतात परंतू कोमट पाणी पिण्याने आरोग्यही चांगलं राहतं आणि शांत झोप देखील लागते.
वजन कमी होण्यास मदत मिळेल
आमचे पचन तंत्र रात्री मजबूत अवस्थेत नसतं. अशात कोमट पाण्यामुळे आहार लवकर पचवण्यात मदत मिळतं. ज्याने वजन कमी होण्यात मदत मिळते.
काळजी आणि उदासीनता दूर होईल
शरीरात पाण्याची कमी ताण निर्माण होतं. यामुळे झोप देखील प्रभावित होते. दिवसाच्या शेवटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरात जल स्तराचे प्रमाण योग्य राहील आणि आपली मन देखील प्रसन्न राहील.
विषारी पदार्थांपासून मुक्ती
कोमट पाणी शरीराचे आंतरिक तापमान वाढवतं आणि घाम निर्माण करतं ज्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत राहतं आणि शरीराला विषाक्त पदार्थांपासून मुक्ती मिळते.