चांगली स्वच्छताः अनेकांच्या घरात डिजिटल थर्मामीटर आहे. कुटुंबातील एखादी व्य्रती आजारी पडली आणि त्यास किरकोळ ताप असेल तर थर्मामीटरच्या मदतीने त्याचा ताप जाणून घेता येतो. थर्मामीटरचा वापर केल्यानंतर तेसॅनेटाइझ करून सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कारण थर्मामीटरच्या टोकावर पाणी सोडणे पुरेसे नाही. त्यास चांगल्यारितीने सॅनिटाइझ करणे आवश्यक आहे. निगा न राखल्यास चांगला व्य्रतीदेखील आजारी पडू शकतो.
थर्मामीटरचे टोक थंड पाण्याने धुवाः डिजिटल थर्मामीटरच्या टोकाला थंड पाण्याने धुणे चांगले आहे. वापरानंतर थर्मामीटर थंड पाण्यात एक-दोन मिनिटे ठेवावे. त्याने त्यावरील विषाणू निघून जातील. थर्मामीटर स्वच्छ करताना डिजिटल भागात जसे की डिस्प्लेत पाणी जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. डिजिटल थर्मामीटरच्या डिस्प्लेत पाणी गेल्यास खराब होऊ शकतो.