पायी चालणे किंवा व्यायाम करणे
दररोज 30 मिनिट पायी चालणे किंवा व्यायाम केल्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. याने आपण मधुमेह, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजारापासून वाचता येऊ शकतं. पोटावर बळ पडणार्या व्यायाम बेली कमी करण्यास फायदेशीर ठरेल.
सकाळच नाश्ता टाळणे योग्य नाही
नेहमी सकाळी नाश्ता केला पाहिजे. नाश्यात आवश्यक पोषक तत्त्व सामील असावे. हे पोषक तत्त्व आमच्या दिवसभराच्या कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. म्हणून सकाळी व्यायाम केल्यानंतर ब्रेकफास्ट नक्की करावा. आपण नाश्यात ओट्स, होल-ग्रेन ब्रेड, अंडी, ऑम्लेट, पोहा, थालीपीठ, रव्याचा उत्तपम, फळं इतर सामील करू शकतात. हे सर्व पदार्थ आपल्यासाठी फायदेशीर ठरतील.
आहाराकडे लक्ष द्या
दिवसभर भूक लागल्यावर अनेकदा चुकीचे पदार्थ खाण्यात येतात ज्यामुळे वजन वाढू लागतो. आपल्याला दुसऱ्यांदा भूक लागल्यावर तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे आपलं वजन आणखी वाढू शकतं. अशात मकाणे, शेंगदाणे सेवन करावे. या व्यतिरिक्त आपण नट्स, ओट्स, चणे, सलाड खाऊ शकतात.