Health Care Tips : अन्नाला विषाणूंपासून मुक्त ठेवण्यासाठीच्या WHO ने सुचवलेले हे 5 मंत्र..

शनिवार, 18 जुलै 2020 (20:51 IST)
कोविड -19 शी वाचण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे आणि या संसर्गापासून वाचण्यासाठी जनजागृती पसरविली जात आहे. या सर्व बाबींना लक्षात घेऊन WHO ने आपल्या अन्नाला दूषित होण्यापासून वाचविण्यासाठी व आहाराला निरोगी ठेवण्यासाठी काही 5 विशेष मंत्र दिले आहेत. चला जाणून घेऊ या काय आहेत ते 5 मंत्र...
 
* फ्रीज मध्ये अन्नाला साठवून ठेवणं एक सामान्य गोष्ट आहे. आपण सर्व असं करतो ज्यामध्ये भाज्या आणि शिजवलेलं अन्न दोन्ही ठेवतो. पण जेव्हा आम्ही हे आपल्या फ्रीजमध्ये साठवून ठेवतो, तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या साठी आपल्याला जागतिक आरोग्य संघटन (WHO) ने आरोग्यदायी आहाराबद्दलची ही 5 सूत्रे दिली आहेत. 
 
जागतिक आरोग्य संघटना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देत आहे की आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नाला जिवाणू आणि विषाणूमुक्त कसं ठेवू शकतो आणि ही जिवाणू आणि विषाणू कोणते आहे ? 
 
जागतिक आरोग्य संघटना किंवा WHO ने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे ही सांगितले आहे की आपण आपल्या अन्नाला फ्रीज किंवा इतर ठिकाणी साठवून ठेवतो तर त्यामध्ये 3 प्रकाराचे सूक्ष्म जीव (मायक्रोऑर्गेनिज्म) असतात. यामध्ये जिवाणू, विषाणू आणि बुरशी असते.
 
सर्वात आधी ते सूक्ष्मजीव असतात, जे आपल्या अन्नाला अजून चविष्ट आणि निरोगी बनवतात, जसे की दुधापासून दही बनविणारे चांगले जिवाणू.
दुसऱ्या प्रकाराचे सूक्ष्मजीव मायक्रोऑर्गेनिज्म ते असतात, जे अन्नाच्या चवीला पूर्णपणे खराब करतात आणि त्या अन्नामधून वास येतो.
तसे तिसरे सूक्ष्मजीव किंवा मायक्रोऑर्गेनिज्म ते असतात ज्यांच्याबद्दल चव आणि वासाने काहीही कळत नाही.
 
WHO च्या मतानुसार तिसऱ्या प्रकाराचे सूक्ष्मजीव किंवा मायक्रोऑर्गेनिज्म आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वात जास्ती घातक असतं, कारण यामध्ये चव आणि वासाने काहीही कळत नाही. पण दुसऱ्या नंबरच्या सूक्ष्मजीवांमध्ये आपल्याला कळतं, कारण दुसऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये अन्नामधून वास येऊ लागतो आणि अन्नाची चव देखील बदलते.
 
तिसऱ्या श्रेणीच्या सूक्ष्मजीवांबद्दल आपल्याला कळतच नाही आणि आपण अन्नाला शिजवून खाऊन देखील घेतो. हे साधारणपणे मांसाहार अन्नात सर्वात जास्त आढळतात.
 
जागतिक आरोग्य संघटनेने अन्नाला निरोगी ठेवण्यासाठी हे 5 मंत्र सांगितले आहे.
* सर्वात आधी खाण्याच्या कुठल्याही वस्तूंना हात लावण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ करावे.
* फ्रीजमध्ये अन्न ठेवताना कच्चे आणि शिजवलेले अन्न दोघांना वेगवेगळे ठेवा. असे केल्याने त्यामध्ये पॅथॉजनिक मायक्रोऑर्गेनिज्म सहसा वाढत नाही.
*  पॅथॉजनिक मायक्रोऑर्गेनिज्म पासून वाचण्यासाठी अन्नाला आधी चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. कच्च किंवा अर्धवट शिजवलेले अन्न खाणं टाळावं.
* स्वयंपाक करताना स्वच्छ पाण्याच्या वापर करावा. 
* अन्नाला योग्य तापमानात साठवावे जेणे करून त्यामध्ये जिवाणू वाढू शकणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती