डोळे निरोगी कसे ठेवायचे, या टिप्स अवलंबवा

बुधवार, 17 जानेवारी 2024 (15:12 IST)
डोळे ही देवाने दिलेली अनमोल देणगी आहे, त्यांच्या मदतीने आपण जगाची दृश्ये पाहू शकतो. मात्र, वाढत्या वयाबरोबर डोळ्यांच्या समस्याही वाढू लागतात. विशेषत: वयाच्या 40 नंतर डोळ्यांशी संबंधित समस्या बहुतेक लोकांमध्ये दिसू लागतात.तरुणांमध्येही डोळ्यांच्या समस्या वाढताना दिसतात.

लहान वयातच चष्मा घातला जात असल्यामुळे कमी दृष्टी आणि प्रकाश नसल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने मुले करत आहेत.डोळे निरोगी ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.

धुम्रपान, स्क्रीनचा अतिवापर यासारख्या वाईट सवयींमुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

१. लहानपणापासूनच पौष्टिक आहार वर लक्ष देणे-
पौष्टिक आहार सर्वांगीण आरोग्य राखण्यासाठी आवश्यक  आहे. डोळ्यांच्या दृष्टीला चांगली ठेवण्यासाठी, डोळयातील पडदा आणि स्नायू निरोगी  ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचा वापर करणे गरजेचे आहे. 

व्हिटॅमिन ए, सी आणि ई, झिंक, ल्युटीन यांसारख्या अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेला आहार हे डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी महत्वपूर्ण मानले जातात. हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, बादाम, अंडे यांसोबत फळे यांचा आहारात समावेश करून डोळे निरोगी ठेवता येतात.

२ डोळ्यांचा व्यायाम करणे आवश्यक आहे-
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जसा व्यायाम गरजेचे आहे तसेच डोळ्यांसाठी देखील व्यायामाची गरज असते.
डोळ्यांच्या व्यायामासाठी दर 20 मिनिटांनी किमान 20 सेकंद 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहण्याची सवय लावा. काही वेळ डोळ्यांना बंद करून क्लॉक आणि एंटीक्लॉक वाइज फिरवा. डोळ्यांच्या स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी रक्ताचा संचार वाढवण्यासाठी योगाचा अभ्यास करणे फायदेशीर मानले गेले आहे. 
 
३. नियमित तपासणी करणे जरूरी आहे-
वाढत्या वयानुसार, डोळ्यांची दृष्टी कमी होऊ  लागते पण याची सुरुवात खूप लवकर पासून होते. 
 जेव्हा समस्या खूप वाढतात तेव्हाच आपल्याला याची जाणीव होते. त्यामुळे डोळ्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. डोळ्यांचे अनेक आजार आहे की जे कोणत्याही लक्षणांशिवाय दीर्घकाळ टिकून राहतात आणि अंतर्गत नुकसान करतात,

यासाठी वर्षातून एकदा नेत्र तपासणीकरणे  गरजेची आहे मधुमेह, उच्च रक्तताप व नेत्र रोग हे कौटुंबिक इतिहासात आहे त्यांनी वर्षातून किमान दोनदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
४. स्क्रीन वेळ  कमी करणे-
स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल, कंप्यूटर वर घालवणारा वेळ. आरोग्य तज्ञांनी  सांगितले आहे की, तुमचा स्क्रीन टाइम जेवढा असेल तेवढी डोळ्यांची  समस्या वाढेल. आपल्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या रूपात ओलावा असतो. 
ही डोळ्यांची फिल्म ही पाणी तसेच इलेक्ट्रोलाइट्स आणि प्रथिने आणि एन्झाईम्स पासून बनलेली आहे.
दीर्घकाळापर्यंत स्क्रीनच्या संपर्कात राहिल्याने कालांतराने अश्रू सुकायला  लागतात आपले डोळे कोरडे होतात. . 
डोळ्यातील ओलावा कमी झाल्याने दुखणे, लालसरपणा,घासणे वाढून जाते. यामुळे डोळ्यांच्या नाजुक त्वचेला दुखापत होऊ शकते.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती