बऱ्याच लोकांना हातात आणि पायात घाम येतो. बरेच लोक या कडे दुर्लक्ष करतात. काहींना असे वाटते की हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणे तर नाही. घाम येणं ही एक सामान्य क्रिया आहे. हे शरीरातील तापमानाला सामान्य ठेवतो. ज्यांना हाताला आणि तळपायात जास्त घाम येतो, त्यांना वैद्यकीय भाषेत हायपरहायड्रोसिस म्हणतात.कधी कधी या कडे दुर्लक्षित करणे बरे नाही. हे मधुमेह, मेनोपॉज,किंवा हायपरथायराईडीझम देखील असू शकते. म्हणून ह्याला गांभीर्याने बघावे.
* अत्याधिक मसालेयुक्त अन्न घेऊ नका- अत्याधिक मसालेयुक्त अन्न खाल्ल्याने देखील घाम येतो. कांदा,लसूण आणि इतर मसाले खाल्ल्याने देखील घाम येतो. शक्य असल्यास अधिक गरिष्ठ आणि मसालेयुक्त अन्न खाऊ नका. सादे आणि सात्विक अन्न खा.