उन्हाळ्यात पेय पदार्थांचे सेवन वाढतं. अनेक लोकं दिवसभर केवळ वेगवेगळ्या प्रकाराचे पेय पदार्थ पितात. कोल्ड ड्रिंक्स, सोडा, पॅक्ड ज्यूस किंवा कॅफिन. पण हे पेय पदार्थ आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का हा विचार न करता केवळ तात्पुरतं थंड वाटावं म्हणून असे पेय पिणे कितपत योग्य आहे. परंतू आपण हे पेय पदार्थ वगळता केवळ पाणी प्यायला तर अनेक बदल दिसून येतील.
विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढतं
अधिक पाणी पिण्याने शरीरात विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राहतं आणि वय वाढलं तरी तारुण्य टिकून राहतं. या व्यतिरिक्त अनेक आजार हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि अपचन सारखे आजार होण्याचा धोका टळतो.