Benefits of Flax Seeds आरोग्य आणि सौंदर्यसाठी अत्यंत फायदेशीर

शुक्रवार, 9 जुलै 2021 (09:50 IST)
तपकिरी-काळा रंगाचे हे लहान बियाणे हृदयरोगासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 
औषधी गुणधर्म असलेली अळशी किंवा जवस लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त आहेत. त्वचा केस आणि मधुमेहासाठी देखील हे फायदेशीर आहे. अळशीचे अनेक गुणधर्म आहे. अळशी अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे.
 
1 वजन, त्वचा, केसांची गळती आणि मधुमेह कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
2 शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढते.
3 दमा, संधिवात, कर्करोगाशी लढण्यास सक्षम.
4 शरीरात ऊर्जा आणि प्रजनन क्षमता वाढविण्यास सक्षम.
5 कोलेस्टेरॉलला नियंत्रित करते.
6 त्वचेस चमक आणते.
7 त्वचेवरील सुरकुत्या कमी करते.
8 वजन कमी करण्यास सक्षम.
9 शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करते.
10 हृदया संबंधी रोगांसाठी लाभकारक.
 
या व्यतिरिक्त अळशीचे अनेक फायदे आहे.
 
1 अळशी केसांसाठी फायदेशीर असते. केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई च्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे केसांच्या वाढीस फायदेशीर ठरते. यात असलेले ओमेगा -3 फॅटी ऍसिड केसांच्या मुळाचे रक्षण करून केसांची वाढ करते. 
 
2 अळशी हृदयविकारांमध्ये फायदेशीर असते. अळशी बियाणे हृदयरोगास उपयुक्त ठरते. ह्यात विरघळणारे फायबर नैसर्गिकरीत्या शरीरातील कोलेस्टेरॉलला नियंत्रित करते. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिनीमधील एकत्र झालेले कोलेस्टेरॉल कमी होऊन रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही. 
 
3 अळशी त्वचेवरील सुरकुत्या दूर करते.
 यात असलेले अँटी ऑक्सीडेन्ट आणि फायटोकेमिकल त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यास लाभकारी असतात. 
 
4 अळशीचे बियाणे मधुमेहासाठी फायदेशीर असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी अळशीचे बियाणे फायदेशीर ठरू शकते. ह्यात कार्बची मात्रा नसते. अळशीचे बियाणे रक्तातील साखर नियंत्रित करते त्यामुळे शरीरावर मधुमेहाचे दुष्परिणाम कमी होतात.  
 
5 अळशी वजन कमी करते. अळशीचे बियाणे दैनंदिन जेवण्यात वापरल्याने वजन कमी करण्यास फायदेशीर असतात. ह्यात फायबर, ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि अँटी ऑक्सीडेन्ट असतात जे वजन कमी करण्यास सक्षम असते. 
 
अळशीचा वापर कसा करावा..?
 
अळशी कच्ची देखील खाता येते किंवा जवसेची चटणी केल्यास ते रुचकर लागते. अळशीचे बियाणे 5 मिनिटे भाजून त्यात तीळ, बडीशेप, खोबरे, काळं मीठ घालून खाल्ल्यास फायदेशीर होते. गॅस, अपचनचा त्रास होत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती