जागतिक कर्करोग दिन : जगभरात दरवर्षी कॅन्सरचे 80 लाख बळी
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (12:11 IST)
दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी, आंतरराष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण संघटना जागरूकता वाढविण्यासाठी आणि कर्करोगाबद्दल लोकांना जागरूक करण्याचे काम करते. कर्करोग प्रतिबंध, लवकर तपासणी, उपचार आणि काळजी याबद्दल आपल्याला आधीपासून माहीत असलेल्या गोष्टींचा वापर करून या आजाराला पळवून लावता येते. जगभरात दरवर्षी 8.2 दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो. तथापि कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल गोष्टी टाळणसाठी निरोगी जीवनाचा अवलंब केला पाहिजे.
संतुलित आहार व वजन नियंत्रणात ठेवून शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहिले पाहिजे. लठ्ठपणाने आता जगभरातील पौगंडावस्थेतील 20 ते 40 टक्के लोकांना प्रभावित केले आहे. वजन जास्त किंवा लठ्ठपणा नंतरच्या आयुष्यात आतड्यांसंबंधी, स्तन, गर्भाशय, स्वादुपिंड, अन्ननलिका, मूत्रपिंड आणि पित्ताशयाचा कर्करोग होणण्याची जोखीमीशी जोडलेला आहे.
मद्यपान हे तोंड, घसा, स्वरंत्र, अन्ननलिका, आतडी, कृत आणि स्तनाच्या कर्करोगासह वेगवेगळ्या कर्करोगाच्या असंख्य जोखमीशी जोडलेले आहे.
तंबाखूमुळे कर्करोगाच्या मृत्यूंपैकी किमान 22 टक्के मृत्यू होतात. ज्या लोकांना तंबाखूचा वापर थांबवाचा आहे, त्यांच्यासाठी सुपदेशनासारखी विविध औषधे आणि संसाधने उपलब्ध आहेत.
अल्ट्राव्हायोलेट (अतिनील किरणे) किरणोत्सर्गाचा अतिरेकी संपर्क हा बहुतेक प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगाचा धोकादाक घटक असतो. टॅनिंग बेड किंवा सनलॅम्प्स टाळणे आणि सूर्याची किरणे सर्वात तीव्र असताना उन्हात फिरणे कमी केले पाहिजे. अथवा ऊन लागू ने म्हणून पूर्ण पोषाख वापरावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार कर्करोगाच्या अंदाजे 1 टक्के निदानामध्ये पर्यावरणाचे योगदान आहे. फुफ्फुसांच्या कर्करोगाचा एक महत्त्वाचा पर्यावरणीय जोखीम घटक म्हणजे वायुप्रदूषण. व्यवसाय हे पर्यावरणीय जोखीम घटकांचे स्रोत देखील असू शकतात.
कर्करोगासकारणीभूत ठरू शकणार्या घटकांचा आणि लोकांचा वैयक्तिक धोका कमी करण्यासाठी लोक काय करू शकतात यावर संशोधकांचे संशोधन चालू आहे. कर्करोगाचा पूर्णपणे प्रतिबंध करणचा कोणताही सिद्ध मार्ग नसला तरी निरोगी आयुष्य जगणे, निवडणे व धोका कमी करण्याच्या दृष्टीने जागरूकता हाच मोठा पर्याय आहे.