World Asthma Day जागतिक अस्थमा दिन

मंगळवार, 4 मे 2021 (09:12 IST)
दरवर्षी मे महिन्यात येणारा पहिला मंगळवार हा 'जागतिक अस्थमा दिन' मानला जातो. अस्थमा या आजाराविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून 'ग्लोबल इनिशिएटीव्ह फॉर अस्थमा' (GINA) या संस्थेतर्फे याचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्ताने दमा आजाराविषयी काही तथ्ये आणि तो सोप्या आणि पद्धतीने कसा नियंत्रणात केला जाऊ शकतो याविषयीचे काही उपाय बघा-
 
दमा म्हणजे
श्वसन मार्गाला दाह किंवा सूज आल्यामुळे फुफ्फुसात जाणार्‍या हवेचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो.
 
लक्षणं
दम लागणे
खोकला
छातीत कोठर जाणवणे
घरघर होणे
 
या प्रकारे करता येतं नियंत्रण
हवा स्वच्छ ठेवणारे एअर प्युरिफायर वापरा.
प्रवास करताना मास्क वापरा.
स्वच्छता करताना मास्क वापरा.
खोली नेहमी स्वच्छ ठेवा.
एका दिवसाआड बेडशीट्स गरम पाण्याने धुऊन वापरा.
स्ट्रांग सुंगध असलेले परफ्यूम वापरणे टाळा.
प्राण्यांपासून दूर राहा. त्यांच्या केसांमुळे किंवा धुलीकणांमुळे अॅलजी होऊ शकते.
आपल्याला अॅलजी असलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती