नोकरी करणार्या महिलांना पुरूषांच्या तुलनेत अधिक ताण असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. अधिक तणावामुळे डिप्रेशनचा धोकाही पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनियॉसमधील संशोधकांनी हे मत मांडले.
संशोधनानुसार ज्या महिलांना अधिक पगार असतो त्यांच्यामध्ये तणावाचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळले. संशोधनानुसार, घरात सर्वाधिक आर्थिक मदत कोण करते याचा त्या व्यक्तीच्या मनोविज्ञानावरही परिणाम होतो. कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न वाढल्यास त्यांच्यात डिप्रेशनची म्हणेच नैराश्य, औदासिन्याची लक्षणे दिसू लागतात. संशोधकांनी केलेल्या या संशोधनात 1463 पुरूष आणि 1769 महिलांचा समावेश करण्यात आला.