World Mental Health Day 2022: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन, जाणून घ्या या 6 गोष्टी

सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (11:05 IST)
World Mental Health Day : जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जगभरात मनवला केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. त्यांना तणावमुक्त जीवन देऊन चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
 
आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जीवन जगणे अवघड काम वाटते. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे आणि चिंतेने आपले जीवन जगत आहे. माणसाने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
 
मानसिक आजार टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तणाव घेतल्याने तुमची समस्या सुटणार नाही, पण त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल हे समजून घ्या. जास्त ताणामुळे चिडचिड, जास्त राग, झोप न लागणे, एकटे राहणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात.
मानसिक आरोग्य दिन, या गोष्टी करून पहा-
 
1. एकटे राहू नका- ज्या व्यक्ती तणावाखाली असतात, ते एकटे राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना इतर लोकांशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. म्हणूनच तुम्ही इतर लोकांशी संपर्क साधणे आणि त्यांच्याशी तुमच्या मनाबद्दल बोलणे खूप महत्त्वाचे आहे. कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही स्वतःला लोकांशी जोडलेले अनुभवाल.
 
2. नकारात्मक लोकांपासून दूर राहा: जे लोक तुम्हाला नकारात्मक बनवतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. जर तुम्हाला त्यांचे ऐकून तणाव वाटत असेल तर त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा. असे केल्याने तुम्हाला स्वतःला सकारात्मक वाटेल.
 
3. चांगले मित्र बनवा: चांगले मित्र बनवा ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकाल आणि तुम्हाला आराम वाटेल. असे मित्र ठेवा जे तुम्हाला तुमच्या बोलण्यावरून जज करत नाही बलकी तुम्हाला समजून घेतात आणि तुमची मदत करतात, कारण चांगले मित्र तुम्हाला आवश्यक सहानुभूती देतात तसेच नैराश्याच्या वेळी योग्य वैयक्तिक सल्ला देतात.
 
4. योग आणि ध्यान: योग आणि ध्यानाला तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. ध्यान केल्याने तुम्ही स्वतःला तणावमुक्त अनुभवाल, त्यामुळे ध्यान आणि योगासने नियमित करा. हे तुम्हाला तणावापासून मुक्त होण्यास आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करेल.
 
5. संतुलित आहार: संतुलित आहारामुळे केवळ शरीरच चांगले नाही तर दुःखी मन देखील चांगले बनते. त्यामुळे फळे, भाज्या, मांस, शेंगा, कार्बोहायड्रेट इत्यादींचा संतुलित आहार घेतल्याने मन प्रसन्न राहते. म्हणूनच त्यांचे अधिक सेवन करा.
 
6. मनाला आनंद देणार्‍या गोष्टी करा: तुम्हाला तुमच्यासाठी थोडा वेळ काढता येईल अशा गोष्टी करा, ज्यामुळे मन प्रसन्न होते. जसे तुम्हाला पुस्तके वाचायला आवडतात, मग पुस्तके वाचा. जर तुम्हाला मित्रांशी बोलायला आवडत असेल तर मित्रांशी बोला. जर नाचण्याने तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर डान्स करा. तुम्हाला आनंद देणार्‍या सर्व गोष्टी करा.

Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा