CoronaVirus : छातीचा X-ray किंवा Swab Test या पैकी कोणता पर्याय योग्य, जाणून घ्या Expert Advice

बुधवार, 6 मे 2020 (10:59 IST)
संपूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान वाढतच आहे. कोरोना व्हायरसची धास्ती सर्वत्र दिसून येत आहे. काही जण तर साधारण सर्दी, खोकला, पडसं असल्यास त्याला पण कोरोनाशी जोडत आहे. त्याच प्रमाणे कोरोनाच्या वाढणाऱ्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवत आहे की कोरोना संक्रमणाची ओळख त्यांचा कुटुंबीयांमध्ये कश्या पद्धतीने करता येऊ शकते. त्यासाठी कोणती तपासणी किंवा चाचणी करता येऊ शकते ? 
 
या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन सीनियर पॅथालॉजिस्ट रामस्नेही विश्वकर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून जाणून घेतले की छातीचा एक्स रे आणि स्वाब टेस्टमधून कुठले पर्याय योग्य आहे ? 
 
सीनियर पॅथालॉजिस्ट रामस्नेही विश्वकर्मा सांगतात की स्वाब टेस्टसाठी प्रयोगशाळेत गळ्यातून किंवा नाकामधून कापसाच्या साहाय्याने स्वाब घेतले जातात. त्यांच्या सांगण्यानुसार कोरोनासाठी 2 प्रकारांच्या चाचण्या केल्या जातात. एक नाकातून स्वाब घेऊन आणि दुसरं गळ्यामधून स्वाब घेऊन चाचणी केली जाते. 
 
नेजल स्वाब चाचणी - 
ज्यांना सर्दीचा त्रास जाणवतो त्याची नेजल स्वाब चाचणी केली जाते. तसेच ज्यांना खोकल्याचा त्रास आहे त्यांची चाचणी घशातून स्वाब घेऊन केली जाते. हे घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्यानंतरच आपल्याला योग्य परिणाम मिळतं.
 
ते सांगतात की कोरोनासाठी स्वाब टेस्ट सर्वात सर्वोत्तम चाचणी मानली गेली आहे. कारण त्या चाचणीचा निकाल 100% मिळतं असतो. त्यासाठी छातीच्या एक्स रे पेक्षा हे स्वाब टेस्ट योग्य आहे. कारण रुग्णाला श्वास घेण्यास काही त्रास तर नाही यासाठी छातीच्या एक्सरे हे घेण्यात येतो परंतू स्वाबच्या माध्यमातून गळा आणि नाक यातून नमुने घेऊन चाचणी केली जाते ज्याने करोनाचे कन्फर्मेशन होऊ शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती