रुबी हॉल क्लिनिकने साजरा केला 'विश्व् रक्तदान दिवस'

गुरूवार, 15 जून 2023 (20:39 IST)
रुबी हॉल क्लिनिक मध्ये 'विश्व् रक्तदान दिवसाचे' औचित्य साधून ११ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले त्यामध्ये ६३७ रक्त युनिट संकलित करण्यात आले. आणि अधिक रक्तदान शिबीर जुलै महिन्यात करण्यात येणार आहेत. ४ व्याख्याने आणि सीएनई तसेच, ४ प्रश्न मंजुषा स्पर्धा, ६ स्किट आणि ३ भाषांमध्ये ३ घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. 
 
• आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान करणाऱ्या १० स्वैच्छिक रक्तदात्यांचा (आरएच निगेटिव्ह आणि ऍफेरेसिस दात्यांनी) सत्कार करण्यात आला.
• आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान करणाऱ्या एका बॉम्बे रक्तगट दात्याचा सत्कार करण्यात आला.
• रक्तदान करून १८ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या एका मुलीचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बिग एफएमचे आरजे संग्राम खोपडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. रक्ताचा महासंग्राम या कार्यक्रमातून ते रक्तदानाला पाठिंबा देत आहेत. 
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. स्नेहल मुजुमदार- संचालक, रक्तसंक्रमण औषध यांनी केले होते. सत्कार समारंभाला मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.पी.के. ग्रँट यांच्यासमवेत श्रीमती गिल ग्रँट, डॉ. सायमन ग्रँट, नताली ग्रँट नंदा, सीईओ-श्री बेहराम खोडाईजी आणि श्रीमती रोक्सेन खोडाईजी, वैद्यकीय संचालक-डॉ. प्रसाद मुगळीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 
 
या प्रसंगी डॉ. स्नेहल मुजुमदार, डायरेक्टर ब्लड ट्रान्सफ्युजन , रुबी हॉल क्लिनिक म्हणाल्या, “आम्ही डॉक्टर आणि सर्जन म्हणून रक्तस्त्राव होण्याचा धोका असलेल्या रुग्णांची ओळख करून देणे, रक्तस्त्राव लवकर थांबवणे किंवा नियंत्रित करणे तसेच रक्तसंक्रमणाची गरज सुरक्षितपणे टाळण्याचे किंवा कमी करण्याचे मार्ग शोधत असलो तरीही. रक्ताची खरी गरज असताना त्याला पर्याय नाही. आणि लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आवश्यक असलेले रक्त मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रक्तदात्यांकडूनच. पुण्याची पहिली NABH मान्यताप्राप्त रक्तपेढी असल्याने, संकलित केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी सुविधांमध्ये उपकरणे वापरली जातात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबरीने, त्यात एकाच छताखाली इरॅडिएशन, ल्युकोडेप्लेशन, ऍफेरेसिस आणि घटक वेगळे करणे यासारखे सर्व प्रकारचे जीवन बदलणारे प्रोटोकॉल आहेत. रक्तपेढीने हिंजवडी आणि वानवरी येथील सॅटेलाइट हॉस्पिटलच्या शाखांमध्येही आपली सेवा विस्तारित केली आहे.”
रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पी.के. ग्रँट म्हणाले, “आपल्या प्रत्येकामध्ये रक्त नावाची जीवनरक्षक भेट असते. तुम्ही दिलेले रक्त एखाद्याला जीवनात आणखी एक संधी देते. एक दिवस, त्याजागी कोणीतरी जवळचा नातेवाईक, मित्र, प्रिय व्यक्ती - किंवा तुम्ही देखील असू शकता. आज येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक रक्तदात्याचा मला अभिमान वाटतो आणि जे करू शकतील त्यांना या उदात्त कार्याला पाठिंबा देण्यासाठी मी प्रोत्साहन देतो.”
 
रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर स्वतः रक्तदाते असून ते म्हणाले, “वेळेचा अभाव, सुयांची भीती आणि नक्की काय आहे हे न समजणे ह्या  सर्व कारणांमुळे लोक रक्तदान करत नाहीत. एक वैद्यकीय संस्था या नात्याने आमचा यासोबत निगडित सर्व गैरसमज दूर करण्याचा आमचा उद्देश आहे आणि या उद्देशाने आम्ही सुरक्षित रक्तदानाच्या महत्त्वाबाबत अंतर्गत जागरूकता कार्यक्रमही आयोजित केले आहेत. शेवटी, नियोजित उपचार आणि तातडीच्या हस्तक्षेपांसाठी रक्त हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. हे जीवघेण्या परिस्थितीमुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांना दीर्घायुष्य आणि उच्च दर्जाचे जीवन जगण्यास मदत करू शकते आणि जटिल वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेस मदत देते.
 
यावेळी रुबी हॉल क्लिनिकचे सीईओ श्री बेहराम खोडाईजी म्हणाले, “आम्ही आरोग्यसेवे मध्ये आघाडीवर असल्याने, रुबी हॉल क्लिनिकमध्ये आम्ही भविष्याकडे पाहण्यासाठी आणि देणगीदारां मध्ये लवचिकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या सोबत उभे आहोत आणि लोकांना याची जाणीव करून देत आहोत की आम्हाला त्यांची अगदी साधी गरज आहे ती म्हणजे रक्ताच्या स्वरूपात योगदान. तुम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा रक्तदान करायला सुरुवात केली तर तुम्ही किती जीव वाचवण्यास मदत करू शकता याचा विचार करा आणि तुम्ही ते करू शकता तसे सुरू ठेवा. केवळ डॉक्टरच जीव वाचवू शकत नाहीत तर तुम्ही सुद्धा वाचवू शकता. एखाद्याला जीवनाची आशा देण्यासाठी फक्त तुमचा थोडासा वेळ द्यायला हवे!"
Edited by :Ganesh Sakpal 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती