फिट राहण्यासाठी नवा फूड ट्रेंड

बुधवार, 28 जुलै 2021 (22:56 IST)
वेट मॅनेजमेंट (वजनावर नियंत्रण ठेवणे) हे आता सर्वांच्याच आयुष्याचा एक भाग बनले आहे. ७०-८० वर्षे वयाचे लोकही याचे काटेकोर पालन करताना दिसतात. सध्या वजन कमी करण्यासाठी जेवणात नवा टड्ढेंड दिसतो आहे. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात व अनावश्यक चरबीपासून सुटका होते. यामुळेच सेंद्रीय पदार्थांची मागणी वाढली आहे. छोट्या दुकानांमध्येही हे पदार्थ सहज मिळू लागले आहेत. लोक फसवे खाद्यपदार्थ उदाहरणार्थ गोड पदार्थांपासून अंतर राखून आहेत. शाकाहारी अन्न अधिक रुचकर करण्याचे विविध प्रयत्न सुरू आहेत. या जेवणात ग्रिल सँडविच, सॅलड, ज्यूस हे पदार्थ समाविष्ट केले जात आहेत. विविध प्रकारच्या तेलांचा वापर केल्यास आरोग्याला लाभ होईल. उदाहरणार्थ सॅलेडमध्ये खोबरेल, भाजीमध्ये मोहरीचे तेल, इत्यादी.
 
दोन-तीन प्रकारच्या धान्यांचे पीठ वापरल्यास शरीराला पौष्टिक घटक मिळतील. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांची मागणी वाढत आहे. लवकरच डॉक्टरही हे पदार्थ खाण्याचा सल्ला देतील. मध्य आशियातील अन्नपदार्थांचा वापर वाढला आहे. हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये तिळाचे पदार्थ, सॅलडचा समावेश होईल. तेलकट किंवा पचनास जड पदार्थांऐवजी साध्या व पचनास हलक्या पदार्थांकडे लोकांचा कल वाढतो आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती