जाणून घ्या लोण्यातील विविधता?

लोणी शरीरासाठी लाभकारक आहे हे आपण जाणतोच. लोण्याचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पाश्‍चराईज्ड क्रीम लोणी हा त्यातीलच एक प्रकार. हे लोणी पाश्‍चराईज्ड केलेल्या ताज्या क्रीमपासून तयार केले जाते. त्याला मंद वास असतो. राईपण्ड क्रीम लोणी हा एक प्रकार पाहायला मिळतो. सुवासिक स्वाद आणण्यासाठी यात विशिष्ट जीवाणूंच्या सहाय्य घेतले जाते. 

अनराईपण्ड क्रीम : या लोण्याला नैसर्गिक लोणी म्हटले तरी चालेल. शुद्ध मलईत कुठलाही स्वाद न मिसळता हे लोणी तयार करतात. 

खारवलेले लोणी : यात लोणी तयार होताना तीन टक्क्यांपर्यंत मीठ मिसळले जाते. 

बिन खारवलेले लोणी : यात मिठाचा वापर केला जात नाही. 

गोड मलईचे लोणी : यात मलईची आम्लता 0.२0 टक्क्यांपेक्षा कमी ठेवली जाते. 

आम्ल मलईचे लोणी : यात मलईची आम्लता 0.२0 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवून लोणी तयार केले जाते.

क्रीमरी बटर : मान्यताप्राप्त डेअरी उद्योगात तयार केलेले लोणी क्रीमरी बटर नावाने विकले जाते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती