डायबेटीस रुग्णांना वरदान असलेली बहुगुणी कोरफड

वरवर रुक्ष दिसणारी कोरफड ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्म असलेली आहे. विशेषतः डायबेटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही वनस्पती वरदान ठरते. अनेक संशोधनातून हे समोर देखील आले आहे.
 
कोरफडीमध्ये क्रोमियम आणि मँगनीझ ही तत्वे देखील आहेत. यामुळे शरीरातील इंश्युलीनची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेह होण्यापासून बचाव होतो. कोरफडीच्या गराचा किंवा रसाचा वापर करण्याऐवजी ताज्या कोरफडीचा उपयोग करणे जास्त फायद्याचे आहे. दररोज दोन लहान चमचे कोरफडीचा ताज्या गराचे सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होण्यास मदत मिळते.
 
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना लहानशी जखम देखील भरून येण्यास खूप वेळ लागतो. वरही कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीचा गर सरळ जखमेवर लावल्याने जखमेमुळे होणारी आग किंवा वेदना कमी होतात, व जखम लवकर भरून येण्यास मदत मिळते.  योग्य आणि संतुलित आहाराच्या जोडीने कोरफडीचे नियमित केलेले सेवन मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती