सर्दीपुढे आता 'नाक' टेकू नका

WD
एवढीशी ती सर्दी पण पार माणसाचे 'पाणी पाणी' करून टाकते. पण थांबा आता अमेरिकेत झालेल्या नव्या संशोधनात एका फुलाद्वारे सर्दी, खोकला ५८ टक्के कमी करता येतो, असा शोध लागला आहे. थोडक्यात काय तर एलोपॅथिक उपचारांवर भर देणार्‍या अमेरिकी शास्त्रज्ञांनाही आता उपचारासाठी निसर्गाकडे वळावे लागले आहे.

इचिनेशिया असे या फुलाचे नाव असून ते उत्तर अमेरिकेत सापडते. या फुलापासून बनविलेल्या औषधाच्या चौदा वेळा चाचण्या घेतल्या. त्यानंतरच शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले आहेत.

जीवनसत्वाबरोबरच हे फूल सेवन केल्यास त्याचे अधिक फायदे आहेत. यात असणारे विषाणू सर्दीला रोखतात. यासंदर्भात संशोधन करणारे डॉ. वॉकर यांनी जे सांगितले ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, घरगुती उपचारांवर जगभरात डॉक्टरमंडळींकडून टीका केली जाते. पण विज्ञानाला हळू हळू त्याचे महत्त्व समजू लागले आहे. या शोधाची सर्व माहिती 'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज' या नियतकालिकात प्रकाशित झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा