वृद्धावस्थेत आढळणारा संधिदाह

WD
संधिदाह हा असा आजार आहे, जो जितका जुना होत जाईल तितकेच त्यामुळे होणाऱ्या वेदनांचे प्रमाण वाढत जाते. साहजिकच लहान वयात हा आजार झाला तर वाढत्या वयानुसार संधिदाह हा अधिकाधिक वेदनाकारक बनत जातो. सांध्यांजवळचे हाड आणि अस्थिंवरील मृदु पेशींचे आवरण यांच्याजवळ होणाऱ्या आणि वेदना असे स्वरूप असलेला संधिदाह हा आजार साधारणपणे वयाची पासष्टी उलटल्यानंतर सुरू होतो. मात्र, अलिकडच्या काळात या आजाराने पीडित असलेल्या रूग्णांची वयोमर्यादा तरूण वयोगटापर्यंत येऊन पोहोचली आहे. संधिदाहासारखा जुनाट आजार तरूण पिढीमध्ये आढळण्याचे प्रमाण वाढते आहे आणि त्याच्या प्रमुख कारणांमध्ये चुकीची जीवनशैली, स्थूलपणा, पोषणाचा अभाव यासारख्या काही कारणांचा समावेश होत असल्याची माहिती एशियन ऑर्थोपेडिक इन्स्टिट्युटचे (एशियन हार्ट इन्स्टिट्युटचा एक विभाग) ऑर्थोपेडिक सर्जन आणि सांधेबदल (जॉईंट रिप्लेसमेंट) विषयक सल्लागार डॉ.सूरज गुरव यांनी दिली.

अलिकडेच अर्थरायटिस केअर ऐन्ड रिसर्च या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या काही शोधनिकषांमध्ये असे नमुद करण्यात आले आहे की स्थूलपणा आणि संधिदाह या दोहोंचा खूप जवळचा संबंध आहे. याविषयीच्या अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहे की बॉडी मास इंडेक्सनुसार (बीएमआय) गरजेपेक्षा अधिक वजन असलेल्या आणि लठ्ठ व्यक्तींमध्ये कमी बीएमआय असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत संधिदाह या आजाराचे निदान होण्याचे प्रमाण अधिक आहे. संधिदाहाने आजारी असलेल्यांपैकी ६६ टक्के रूग्ण हे गरजेपेक्षा अधिक वजन असलेले आणि लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे.


WD
भारतीय रूग्णांमध्ये संधिदाह या आजाराचे सर्वाधिक प्रमाण गुडघ्यामध्ये आणि त्याखालोखाल कमरेलगतच्या हाडांमध्ये आढळते.

संधिदाह या आजाराविषयी सूचना करणारी लक्षणे जाणुन घ्या

जर तुम्हाला शरीरातील सांधे किंवा त्यांच्या जवळपास दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पुढीलपैकी कोणतीही लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्याः

वेदना

कडकपणा

सूज (कधीकधी)

सांधे दुमडताना त्रास होणे.

आजाराचे लवकरात लवकर निदान करून घ्या आणि त्यावर उपचारही घ्या.
आजाराचे लवकर निदान आणि त्यावर त्वरेने उपचार या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत. यामुळे तुम्हाला सांध्याची हानी होण्याची प्रक्रिया- जी संधिदाहाचे निदान झाल्यापासून पहिल्या काही वर्षांत होऊ शकते- ती प्रक्रिया मंदावण्यास किंवा रोखण्यास मदत होते. हा आजार जितका अधिक काळ राहिल तितकीच सांध्यांची हानी अधिक प्रमाणात होते. त्यामुळे निदान झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर उपचार करून घेणे रूग्णाच्या हिताचे ठरते.

WD
शरीराचे वजन योग्य प्रमाणात राहिल याची काळजी घ्या.
आपले शारीरिक वजन योग्य प्रमाणात ठेवल्यामुळे गुडघे आणि बहुतेकवेळेस कमरेलगतचे सांधे व हातांमध्ये ऑस्टिओअर्थरायटिस-अस्थिसंधिदाह हा विकार बळावण्याची शक्यता कमी होते.

सांधे सुरक्षित राहतील याची काळजी घ्या.
अपघात, जखम किंवा अतिवापर यांमुळे सांध्यांलगत दुखापत झाल्यास पुढे जाऊन अस्थि-संधिदाह हा आजार बळावण्याची शक्यता वाढते. यासाठी सांध्यांवरील स्नायुंचे वेष्टन मजबूत राहण्याकरिता प्रयत्न केल्यास सांध्यांना दुखापत होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

व्याया
नियमितपणे शारीरिक व्यायाम केल्याने हाडे. स्नायू आणि सांधे मजबूत बनण्यास आणि त्यांचा मजबुतपणा टिकुन राहण्यास मदत होते.

वेबदुनिया वर वाचा