जंकफूड गर्भवतींसाठी विषासमान

सध्याच्या धावपळीच्या युगात जंकफूड आणि फास्टफूड व्यक्तीच्या अरोग्याचा आविभाज्य भाग बनला असून, गर्भवती महिलादेखील याचा चवीने आस्वाद घेताना दिसतात, पण हेच जंगफूड गर्भवतींसाठी धूम्रपानाइतकेच घातक असल्याचे नव्या संशोधनातून उघड झाले आहे. जंकफूडमध्ये आढळून येणारे आक्रेलमाईड हे रसायन अर्भकाच्या मेंदूवर विपरित परिणाम करते. बटाट्याच्या चिप्स अधिक चवीष्ट आणि कुरकुरीत करण्यासाठी या रासायनिक घटकाचा वापर केला जातो. गर्भवतीने जंकफूडचे सेवन केल्यास तिच्या गर्भातील बाळाच्या मेंदूचीवाढ होऊ शकत नाही. त्यामुळे जन्माला येणारे बाळ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पंगू होऊ शकते. स्पेनच्या बार्सेलोना शहरातील संशोधकांनी एक हजार महिलांवर प्रयोग केल्यानंतर हा ‍निष्कर्ष काढला आहे. आक्रेलामाईडचे मानवी शरीरातील प्रमाण वाढल्याने महिलांची कामशक्ती कमी होत असल्याचेही दिसून आले. त्यामुळे गर्भवती मातांनी कुठल्याही स्थितीत जंकफूडचे सेवन करू नये, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या महिला जंकफूडचे सेवन करतात, त्यांच्यातील गर्भधारणेची क्षमता तीन वर्षे आधीच नष्ट होत असल्याचे दिसून आले. 

मध्यंतरी झालेल्या संशोधनात जंकफूड कर्करोगासदेखील कारणीभूत ठरत असल्याचे सिद्ध झाले होते. पाश्चात्य देशांत जंकफूड सेवनाचे प्रमाण अधिक असल्याने त्यावर कायदेशीर बंधने आणली जावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

वेबदुनिया वर वाचा