तुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का?

तुम्ही बघितले असेल की जेव्हा कधी घरात कोणाच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा सर्वात आधी जन्मपत्रिकांचे मिलन केले जाते. पत्रिकेत गुण, नाडी दोष आणि गणावर जास्त जोर देण्यात येत. कारण यावरच आपले दांपत्य जीवनाचे भविष्‍य टिकलेले असते. ज्योतिष शास्‍त्रानुसार प्रत्येक मनुष्याला तीन वर्गांमध्ये विभाजित केले जाते जे त्यांच्या गणच्या आधारावर निर्धारित आहे. हे तीन वर्ग आहे देव गण, मनुष्य गण आणि राक्षस गण. गणाच्या आधारावर मनुष्याचा स्वभाव आणि त्याचे चरित्र देखील अवलंबून असते.    
 
देव गण : देव गणाशी संबंध ठेवणारा जातक दानी, बुद्धिमान, कमी जेवणारा आणि कोमल हृदयाचा असतो. अशा व्यक्तींचे विचार फार उत्तम असतात, तो आपल्या आधी दुसर्‍यांच्या हिताचा विचार करतो.  
 
मनुष्य गण : ज्या लोकांचा संबंध मनुष्य गणाशी असतो ते धनवान असून धनुर्विद्यांचे चांगले जाणकार देखील असतात. त्यांचे डोळे मोठे मोठे असतात तसेच समाजात त्यांचा फार मान असतो आणि लोक त्यांच्या म्हणण्या बाहेर नसतात.  
 
राक्षस गण : पण जेव्हा गोष्ट येते राक्षस गणाची तर बरेच लोक याचे नाव ऐकूनच घाबरून जातात. पण यात घाबरण्यासारखे काहीच नसते.    
 
नकारात्मक शक्तींना ओळखून घेतात : आमच्या आजूबाजूस वेग वेगळ्या प्रकारच्या शकत्या उपस्थित असतात, ज्यात काही   नकारात्मक असतात तर काही सकारात्मक. ज्योतिष विद्येनुसार राक्षस गणाचे जातक नेगेटिव्ह एनर्जीला लवकर ओळखून घेतात. त्याशिवाय राक्षस गणच्या जातकांचे सिक्स सेंस जास्त योग्य प्रकारे काम करते. हे लोक साहसी आणि मजबूत इच्छाशक्तीचे असतात, त्यांची जगण्याची पद्धत स्वच्छंद असते.  
 
नक्षत्र : आश्लेषा, विशाखा, कृत्तिका, मघा, ज्येष्ठा, मूल, धनिष्ठा, शतभिषा नक्षत्रात जन्म घेणारे लोक राक्षस गणाचे असतात.  
 
गण मिळणे गरजेचे आहे : लग्नाच्या वेळेस पत्रिका मिलन करताना ज्‍योतिषाचार्य गणांचे देखील मिलन करतात. गणांचे योग्य मिलन झाल्याने दांपत्य जीवनात सुख आणि आनंद कायम राहतो. बघा कोणत्या गणासोबत योग्य होतो मिलन -: 
- वर - कन्येचे समान गण असल्यास दोघांमध्ये उत्तम सामंजस्य असते.  
- वर - कन्या देव गणाचे असतील तर वैवाहिक जीवन संतोषप्रद राहत.  
- वर - कन्येचे देव गण आणि राक्षस गण असल्यास दोघांमध्ये सामंजस्य न्यून असत आणि त्यांच्यात पारस्परिक टोकाची   स्थिती बनलेली असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती