लहान मुलांच्या हातावर किंवा गळ्यात काळा धागा बांधला जातो, जो त्यांना वाईट नजरेपासून वाचवतो हे समजले जाते. त्याचप्रमाणे इतर रंगांचे धागे देखील अनेक प्रकारचे अडथळे आणि त्रासांपासून संरक्षण करतात. जर तुम्ही मौल्यवान रत्ने घालू शकत नसाल तर ग्रहांच्या रंगाचा धागा बांधून पहा, तुम्हाला यश मिळेल...
* शनिदेवाच्या कृपेसाठी निळ्या रंगाचा सुती धागा बांधावा.
* बुध ग्रहासाठी हिरव्या रंगाचा मुलायम धागा बांधावा.
* गुरु आणि विष्णूसाठी पिवळ्या रंगाचा रेशमी धागा हातात बांधावा.
* शुक्र किंवा लक्ष्मीच्या कृपेसाठी पांढरा किंवा क्रिम रंगाचा रेशमी धागा बांधावा.
* राहू-केतू आणि भैरवाच्या कृपेसाठी तपकिरी-काळा धागा बांधावा.
* हनुमान किंवा मंगळाच्या कृपेसाठी हातात लाल रंगाचा धागा बांधावा.