Friday ला विकत घेतलेले सामान आणतात घरात सुख समृद्धी

ज्यावर लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात सदैव सुख-समृद्धीचा वास असतो. लक्ष्मी रुष्ट झाल्याने घरात दरिद्रता येते म्हणून शुक्रवारी काही सोपे उपाय करायला पाहिजे. असे मानले जाते की जे लोक शुक्रवारी नवीन कपड्यांची खरेदी करतात, शुक्र देव आणि महालक्ष्मी त्यांच्यावर सदैव प्रसन्न असते.  या दिवशी खरेदी केलेले नवीन कपडे जास्त दिवस टिकतात.  
 
तुला आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, या जातकांनी शुक्रवारी पांढरे किंवा सिल्वर रंगांच्या वाहनांची खरेदी करायला पाहिजे.  
 
सुवर्ण आणि चांदीचे भांडे, नाणे आणि आभूषण खरेदी करणे चांगले असतात.  
 
याच दिवशी पांढर्‍या रंगांचे वस्त्र, मिठाई, दूध, दही, साखर घरी आणल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.  
 
जी स्त्री महालक्ष्मीकडून सदैव सौभाग्यवती राहण्याची इच्छा बाळगते तिने स्वत: सुवासिनीचे सामान स्वत:साठी विकत घ्यायचे आणि त्याचे दान देखील करावे.  
 
गायीचे दूध विकत घ्यावे, श्रीयंत्राचा अभिषेक करावा. त्यानंतर या पाण्याला संपूर्ण घरात शिंपडावे. असे केल्याने घरात पैसाची चणचण राहत नाही.  
 
शुक्रवारी 3 बालिकांना घरी बोलावून भोजन करवायला पाहिजे आणि पिवळे वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्यायला पाहिजे. असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.  
 
कमळ किंवा गुलाबाच्या फुलांचा हार विकत घेऊन लक्ष्मी मंदिरात महालक्ष्मीला अर्पण केले पाहिजे.  

वेबदुनिया वर वाचा