Rajyog तुमच्या हातात या रेषा असतील तर मिळेल राजयोग, देवी लक्ष्मीची आहे विशेष कृपा

शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (12:22 IST)
Palmistry Rajyog तुमच्या हाताच्या रेषांमध्ये राजयोग आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख खास आपल्यासाठी आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात हस्तरेषा महत्त्वाची मानली जाते. हस्तरेषेच्या मदतीने भूतकाळ, भविष्य आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांचा अंदाज बांधता येतो. व्यक्तीच्या हातावर अशा काही खुणा आणि रेषा असतात ज्या राजयोगाची निर्मिती दर्शवतात. ज्यांच्या हातात या रेषा असतात, त्यांचे जीवन भौतिक सुख-सुविधांनी भरलेले असते. आयुष्यभर सुख-समृद्धीची कमतरता नसते. तुमच्या हातावर या खास रेषा किंवा चिन्हे आहेत का ते जाणून घ्या.
 
ही खूण तळहाताच्या मध्यभागी असावी
ज्या व्यक्तीच्या तळहाताच्या मध्यभागी तोरण, बाण, रथ, चक्र किंवा ध्वजाचे चिन्ह असते त्याला जीवनात मोठे यश प्राप्त होते. अशा लोकांना राज्य करण्याची एक मोठी संधी नक्कीच मिळते. अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात शाही आनंद मिळतो. ते आयुष्यात भरपूर पैसे कमावतात. सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळते.
 
अशा शनीची अशी रेषा असलेले लोक प्रशासकीय पदांवर विराजमान असतात
ज्या व्यक्तीच्या तळहातावर पुण्य रेषा अनामिका बोटाखाली आणि मणिबंधापासून मधल्या बोटापर्यंत शनी रेषा जाते, त्यांना राज्याचे सुख प्राप्त होते. अशा व्यक्तीवर शनिदेवाची विशेष कृपा असते. असे लोक प्रशासकीय पदावर असतात. आयुष्यात भरपूर पैसे कमवतात.
 
अंगठ्यावर हे चिह्न असलेले लोक मोठे उद्योगपती होतात
एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्यामध्ये मासे, वीणा किंवा सरोवर अशी चिन्हे असतील तर अशा व्यक्तीला खूप प्रसिद्धी मिळते. अशी चिन्हे असलेले लोक मोठे उद्योगपती किंवा व्यापारी बनतात. त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. अगदी बारकाईने पाहिल्यानंतरही या खुणा दिसतात.
 
तळहातावर अशी खूण असणारे राजकारणी होतात
हस्तरेषा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर त्रिशूल चिन्ह असेल तर त्याला खूप मान-सन्मान मिळतो. ज्या व्यक्तीच्या तळहातावर हृदय रेषेच्या शेवटी बृहस्पति पर्वताजवळ त्रिशूलाचे चिन्ह असते त्याला समाजात मान-प्रतिष्ठा मिळते. अशी व्यक्ती राजकारणातही उच्च स्थानावर विराजमान होते आणि समाजात लोकप्रियता मिळवते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती