3 जून रोजी शनी जयंतीला चढवा ह्या 4 वस्तू, दूर होतील सर्व समस्या
शुक्रवार, 24 मे 2019 (15:03 IST)
सोमवारी 3 रोजी शनी जयंती आहे आणि या दिवशी शुभ परिणाम मिळवण्यासाठी विशेष पूजा केली जाते आणि बरेच लोक त्यासाठी शनी मंदिरात जातात. येथे जाणून घ्या 4 अशा वस्तू ज्या शनीला अर्पित केल्यातर सर्व अडचणींवर तुम्ही मात करू शकता.
पहिली वस्तू आहे निळे फूल
शनीला अपराजिताचे फूल अर्पित करा. हे फूल निळे असतात. शास्त्रानुसार शनी निळे वस्त्र धारण करून असतो, त्याला निळा रंग प्रिय आहे. यामुळे शनीला हे फूल अर्पित केले पाहिजे.
दुसरी वस्तू आहे तेल
शनीला तेल चढवायची परंपरा फारच जुनी आहे आज देखील लोक शनीवारी तेलाचे दान करतात. 25 मे रोजी देखील शनीला तेल चढवायला पाहिजे.
तिसरी वस्तू काळे तीळ
शनी काळ्या तिळाचा कारक आहे. शनीला काळ्या वस्तू प्रिय आहे. यामुळे शनीच्या पूजेत काळे तिळाचे फार महत्त्व आहे.
चवथी वस्तू आहे नारळ
नारळाशिवाय कुठल्याही देवी देवतांची पूजा पूर्ण होत नाही. जर तुम्ही शनी मंदिरात जात असाल तर तेथे नारळ अवश्य चढवा.