Shani Jayanti 2021 : शनी ग्रह या वयात भयंकर परिणाम देतं

गुरूवार, 10 जून 2021 (11:27 IST)
जन्मापासून वयाच्या 48 व्या वर्षापर्यंत सर्व ग्रहांचे वयाच्या प्रत्येक वर्षामध्ये भिन्न प्रभाव पडत असतो. त्यात नऊ असे विशेष वर्ष आहेत, जे ग्रहांशी निगडित वर्ष मानले जातात ज्यांवर त्या ग्रहांचा शुभ किंवा अशुभ प्रभाव पडत असतो. लाल किताब अनुसार शनि ग्रह वयाच्या कोणत्या वर्षात विशेष फल प्रदान करतं हे सांगण्यात आलं आहे-
 
शनी आणि वय :
1. शनीचा प्रभाव वयाच्या 36 ते 42 वर्षांदरम्यान दिसून येतो.
2. जर ते चांगले असेल तर घर, व्यवसाय आणि राजकारणात फायदा होतो पण तो अशुभ असेल तर तोटा होतो.
 
लाल किताबच्या मते बुधाचा प्रभाव वयाच्या 34  ते 36 वयोगटात आणि शनीचा प्रभाव 36 ते 42 वयोगटात पडतो. जेथे बुधाचा संबंध व्यवसाय आणि नोकरीशी आहे, तिथे शनि तुमच्या आयुष्यातील इतर अनेक महत्वाच्या गोष्टींशी संबंधित आहे. जर आपल्या कुंडलीत यापैकी कोणताही ग्रह वाईट असेल तर सावध राहण्याची गरज आहे. हे वय आपल्यामध्ये स्थिरता आणते. आपण पुढील उपाययोजना केल्या तर या वर्षांमध्ये आपण इच्छित यश मिळवू शकता.
 
शनीसाठी उपाय:-
 
1. दररोज कावळ्याला पोळी खाऊ घालावी.
2. दर शनिवारी सावली दान करावी.
3. दारुचे व्यसन नसावे आणि भैरव बाबाची उपासना करावी.
4. दात स्वच्छ ठेवावे आणि अंध, अपंग, नोकरदार व सफाई कामगारांशी चांगले वर्तन ठेवावे.
5. शनी वाईट असल्यास तीळ, उडीद, लोखंड, तेल, काळा कपडे आणि शूज दान करा. शनीचा प्रभाव चांगला असेल तर या वस्तूंचे दान करु नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती