सामुद्रिक शास्त्राची रचना ऋषी समुद्र यांनी केली होती. सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीची शारीरिक बनावट, हाव-भाव आणि चिन्हांच्या आधारावर त्याच्या स्वभाव आणि भविष्याबद्दल सांगण्यात आले आहे. समुद्र शास्त्रानुसार मनुष्याच्या शरीरातील प्रत्येक अंग त्याचा स्वभाव आणि भविष्याबद्दल काही ना काही सांगतो. समुद्र शास्त्रानुसार, मान हे असे अंग आहे जे कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावाला चांगल्या प्रकारे व्यक्त करतो. मान हे शरीरातील तो भाग आहे, ज्यावर डोक्याचा भार टिकलेला असतो. मस्तिष्कातून निघून सर्व अंगापर्यंत पोहोचणार्या नसा यातूनच जातात. तर जाणून घेऊ कशी मान असणार्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो.
लांब मान – सामान्यापेक्षा जास्त लांब असणार्या मानेचे लोक गप्पे मारणारे, मंदबुद्धी, अस्थिर, निराश आणि चापलूस स्वभावाचे असतात.