चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने वाढतो कलेकलेने कमी होतो, अगदी त्याप्रमाणे तुम्ही कधी कधी सकारात्मक असतात तर कधी अचानकच देशाच्या कर्जाचा बोजा आपल्या एकटयावरच आहे की काय, असे नर्वस होतात. जशी अमवास्या पोर्णिमा अशी चंद्राची स्थिती असते, तशी तुमच्या मनाची अवस्था असते.
तुमच्या ओठावरती येणारा प्रत्येक शब्द हृदयाच्या ठोक्याप्रमाणे हळूवार पणे येतो, म्हणून तर तुम्ही हळवे असतात. जीवनातील प्रत्येक प्रसंग म्हणजे तो कोमल असो किंवा कठोर, तो अगदी हळूवारपणे अनुभवत असता. तुम्हाला कौटुंबिक जीवन जास्त आवडते. आपले घर आपला संसार या संबंधीत लहान मोठी स्वप्ने कशी पूर्ण करावीत यासाठी तुम्ही रात्र-दिवस धडपडत असतात.
WD
तुम्ही खूपच हळवे असता. दुसऱ्याचे दुःख पाहुन तुम्हाला दुःख होते. तुमच्या डोळयामध्ये पाणी येते. एवढे तुम्ही हळवे कनवाळू मायाळू असतात.
तुम्ही खूपच भिडस्त स्वभावाचे आहात. तसे पाहीले तर तुम्ही खूप मुडी स्वभावाचे आहात. पण जरी तुमच्या मुड जाण्याच्या मागे मोठे ठोस कारण असले तरी सुध्दा तुम्हाला सर्वच भावना शब्दात मांडायला येत नाही. त्यामुळे तुमच्या स्वभावाला समोरच्याला जाणून घेता येत नाही. त्यामुळे थोडेसे मोकळेपणाने वागा.