Magh Purnima 2024 Daan: माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हवा असल्यास राशीनुसार दान करा

शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (08:33 IST)
Magh Purnima 2024 Daan: हिंदू पंचागानुसार दरवर्षी माघ महिन्यात येणारी पौर्णिमा ही माघ पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तसेच हिंदू धर्मात ही पौर्णिमा खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दान आणि स्नान यांचे खूप महत्त्व आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला जे लोक भगवान विष्णूची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच त्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो.
 
ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे देखील महत्त्वाचे आहे. या महिन्यात जे दान करतात आणि स्नान करतात त्यांना सुख आणि सौभाग्य सोबत धन प्राप्त होते. हिंदू पंचागानुसार 2024 मध्ये माघ महिन्याची पौर्णिमा 24 फेब्रुवारी रोजी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी राशीनुसार दान केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 
राशीप्रमाणे दान करा
मेष - ज्योतिष शास्त्रानुसार माघ पौर्णिमेला मेष रास असणार्‍या जातकांनी सूर्य देवाची पूजा करावी आणि विष्णु सहस्त्रनाम पाठ करावा. सोबतच लाल वस्त्र, लाल चंदन आणि लाल मसूर डाळ याचे दान करावे.
 
वृषभ - वृषभ रास असणार्‍यांनी माघ पौर्णिमेला खीरीचे दान करावे. सोबतच रात्री चंद्र देवाची पूजा करुन पांढरे फूल अर्पित करावे. असे केल्याने कामात येत असलेले अडथळे दूर होतील.
 
मिथुन- माघ पौर्णिमेला मिथुन रास असणार्‍या जातकांनी पाण्यात उसाचा रस मिसळून स्नान करावे. सोबतच या दिवशी हिरवे मूग आणि वस्त्र दान करावे. असे केल्याने गणपतीची कृपा मिळते.
 
कर्क - कर्क रास असणार्‍यांनी माघ पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यात पंचगव्य मिसळावे. नंतर सत्यनारायणाची पूजा करावी आणि ब्राह्मणांना कणिक आणि गुळाचे दान करावे. असे केल्याने नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती होते.
 
सिंह- सिंह रास असणार्‍यांनी या दिवशी गरजू व्यक्तीला मिठाईचे दान करावे. मिठाई दान केल्याने विवाह संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.
 
कन्या - माघ पौर्णिमेला कन्या रास असणार्‍या जातकांनी लहान कन्येला नारळ दान करावे. याने कर्ज संबंधक्ष सर्व समस्या नाहीश्या होतात.
 
तूळ - माघ पौर्णिमेला तूळ रास असणार्‍यांनी तेल किंवा तुपाचे दान करावे. या वस्तंचे दान केल्याने दांपत्य जीवनात आनंद येतो.
 
वृश्चिक - वृश्चिक रास असणार्‍यांनी पौर्णिमेला लाल कपडा, दही, तीळ आणि मूंगा याचे दान करावे. याने घरात सुख-समृद्धी नांदते.
 
धनु- धनु रास असणार्‍यांनी माघ पौर्णिमेला 7 पिवळे फुलं दान करावे. याने विवाहाचे योग बनतात.
 
मकर- माघ पौर्णिमेला मकर रास असणार्‍यांनी तीळ दान करावे. असे केल्याने आर्थिक संकट दूर होतं.
 
कुंभ - कुंभ रास असणार्‍यांनी माघ पौर्णिमेला काळ्या कपड्याचे दान करावे. असे केल्याने कोणत्याही कामात यश मिळतं.
 
मीन - माघ पौर्णिमेला मीन रास असणार्‍यांनी पिवळ्या वस्तू, पुस्तकं, लाल वस्त्र आणि मध याचे दान करावे. असे केल्यान लाभ मिळतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती