आज ज्येष्ठ पूर्णिमा आहे आणि ज्या प्रकारे अमावास्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव अधिक असतो त्याच प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक शक्ती आपल्या चरमवर असतात. म्हणून पौर्णिमेचा लाभ घ्यायलाच हवा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन करून मानसिक शांती प्राप्त होते. एकाग्रता वाढते. तसेच शास्त्रानुसार या दिवशी चंद्र, प्रभू विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने जीवनात कोणत्याही प्रकाराचे संकट राहत नाही. सर्व अडचणी आपोआप दूर होतात.
आता आपण बोलू या त्या एका उपायाबद्दल जे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. आपल्या इच्छित परिणामासाठी आपण या प्रकारे पौर्णिमेच्या रात्री हा उपाय करू शकता:
सर्वात आधी बोलू या दांपत्य जीवनाबद्दल
दांपत्य जीवनात गोडावा टिकून राहावा अशी इच्छा असणार्यांनी हा उपाय पौर्णिमेच्या रात्री करावा. सफल दांपत्य जीवनासाठी नवरा किंवा बायकोने किंवा दोघांनी मिळून हा उपाय केल्यास तर निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील पण आपल्या सोयी प्रमाणे नवरा किंवा बायकोमधून कोणीही हा उपाय करू शकतात. आपल्याला चंद्राला दुधाने अर्घ्य द्यायचे आहे. परंतू दुधात साखर किंवा इतर कोणताही पदार्थ न मिसळता आपल्याला चंद्राला पौर्णिमेच्या रात्री अर्घ्य देणे योग्य ठरेल. अर्घ्य देताना या मंत्राचा जप करावा: ऊँ स्त्रां स्त्रीं स्त्रौं स: चंद्रमासे नम:
आता धन संबंधी समस्या सुटाव्या अशी इच्छा असणार्यांसाठी हा उपाय आहे. धनाची कमी भासत असेल, किंवा धन टिकत नसेल तर पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात साखर आणि अख्खे तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावे.
धनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करता येईल. याने हळू हळू आर्थिक संकट दूर होईल.
आता एक उपाय सर्व मनोकामाना पूर्ण होण्यासाठी. मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी कच्च्या दुधात पूजेत वापरत असलेलं चंदन आणि मध मिसळून चंद्राला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना - ऊँ सोम सोमाय नम:
या मंत्राचा जप करावा. याने मनोकामाना निश्चित पूर्ण होईल.
तर आपल्याला दुधाने चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे परंतू पूर्ण दुधाने अर्घ्य देणे शक्य नसल्यास आपण त्या शुद्ध पाणी मिसळू शकता. या उपायाने निश्चितच दांपत्य जीवनात सुख, आर्थिक स्थितीत सुधार आणि सर्व मनोकामना पूर्ण होईल.