अनेकदा असे पाहण्यात आले आहे, की व्यक्ती ज्या जागेवर जन्म घेतो ते स्थान त्याच्या भाग्योदयासाठी चांगले नसते. पण जन्म ठिकाणाहून दूर गेल्याबरोबरच तो प्रगती करू लागतो. त्यासाठी जन्मपत्रिकेचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
राश्यानुसार बघितले तर मेष, सिंह, धनू पूर्व दिशेला दर्शवतात. वृषभ, कन्या, मकर ह्या राश्या दक्षिण दिशेला दर्शवतात. मिथुन, तुला, कुंभ पश्चिम दिशेला दर्शवते. कर्क, वृश्चिक, मीनची उत्तर दिशा असते.
ग्रहांची दिशा
ग्रहांमध्ये सूर्य- पूर्व, चंद्र - वायव्य, मंगळ - दक्षिण, बुध - उत्तर, गुरू - उत्तर-पूर्व, शुक्र - दक्षिण-पूर्व, शनी - पश्चिम, राहू-केतू दक्षिण-पश्चिम दिशांचे स्वामी आहेत.