या काडीने दात घासल्याने दीर्घायुष्य लाभतं, विधवा किंवा विधुर दोष दूर होतं

शुक्रवार, 26 मार्च 2021 (11:54 IST)
काही शास्त्रांमध्ये ग्रह दोषाचे उपाय म्हणून औषधी वनस्पती याबद्दल माहिती दिली गेली आहे. असे म्हणतात की मंगळ किंवा मंगळ दोषामुळे पती- पत्नी यांच्या दांपत्य जीवनात अनेक प्रकाराचे दोष निर्माण होतात. मंगळ दोष शांतीसाठी सांगण्यात आलेल्या उपायंपैकी एक म्हणजे जडी-बूटी द्वारे उपाय करणे. आचार्य मणिबंध कृत 'पाकनिर्झरा' यात मंगळ दोष दूर करण्याचे उपाय सांगण्यात आले आहे.
 
'मौद्गल्योऽथकुटिलः प्रेतस्‌ त्रिजातेक्षु पिंकरादुधी। जानक्योऽविराभूता पुंकरस्रग्ध दक्षा कुजाः।'- पाकनिर्झरा
 
उपरोक्त औषधी वनस्पती मध्ये एक आहे जानकी जडी. जर एखाद्याच्या कुंडलीत विधवा किंवा विधुर होण्याचे योग असल्यास या औषधी काडीने दात घासल्याने हे दूर होऊ शकतात. या औषधीचे नाव आहे जानकी. लंका निवास दरम्यान माता जानकी प्रभू राम यांच्या दीर्घायुष्यासाठी याच प्रकारे दात घासतात होत्या. म्हणून या औषधीचे नाव जानकी असे पडले.
 
याला गावाठी भाषेत दांतर असे म्हटलं जातं. कधी बरे न होऊ शकणारे आजार आणि उग्र वैधव्य दोष या व्यतिरिक्त पती किंवा पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी याने दात घासले जातात. हे श्रीलंकात सापडतं. इतरत्र मिळणे दुर्लभ आहे.
 
पौराणिक ग्रन्थांप्रमाणे हे एक सुंदर पाने असलेली काडी परंतू तुरट स्वाद असलेलं वृक्ष आहे. नासूर आणि भगन्दर सारख्या आजारांवर ही रामबाण औषधी असल्याचे मानले गेले आहे. आठव्या भावात मंगळ दोषामुळे उत्पन्न वेदना निवारण हेतु ही वनस्पती वापरली जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती