मुलांक आणि वाहन खरेदी!

ND
तुमच्या भाग्यात वाहन सुख आहे की नाही आणि जर असेल तर केव्हा? या सर्व गोष्टी तुमच्या पत्रिकेचे अध्ययन केल्याने कळते, पण तुम्ही एखादे वाहन खरीदी करत असाल तर मूलांकानुसार कोणता रंग व नंबर तुम्हाला सूट होईल हे पाहूया.

मुलांक 1 - या लोकांसाठी गोल्डन, कॉपर किंवा रस्ट कलर चांगले असतात. वाहनाचे नंबर 2, 4, 7, 11, 20, 10, 19, 28 इत्यादी असायला पाहिजे किंवा त्यांचा योग एवढा असेल तर फारच चांगले.

मुलांक 2 - तुमच्यासाठी हिरवा, पांढरा किंवा क्रीम कलर उत्तम. वाहनाचे नंबर,4, 7,10, 16,19, 25, 28, 31 इत्यादी असेल तर ते वाहन तुमच्यासाठी शुभ ठरेल.

मुलांक 3 - या लोकांना निळा, पिंक, जांभळा असे रंगांचे वाहन खरेदी करायला पाहिजे. वाहनांचे नंबर 3, 21, 12, 30, 6,9,15,24,18 असेल तर वाहन खरेदीचा आनंद दुप्पट होईल.

मुलांक 4 - यांना शाइनी ब्लु, इलेक्ट्रिक ग्रे या प्रकारचे शेड्सची खरेदी करायला पाहिजे. वाहनांचे नंबर 22, 31, 1, 2, 7, 16, 19, 20, 25, 28, 29 असेल तर हे वाहन तुम्हाला उत्तम सुख देतील.

ND
मुलांक 5 - ह्या लोकांसाठी पांढरे, क्रीम आणि ग्रे रंगांचे सर्व शेड चांगले असतात. अधिक डार्क रंग घेऊ नये. वाहनांचे नंबर 5,14, 23, 1, 7, 12, 34 इत्यादी घ्यायला पाहिजे.

मुलांक 6 - यांच्यासाठी लाल, निळा, पिंक किंवा याच प्रकारचे शेड्स चांगले असतात. काळा आणि जांभळा रंग घेणे टाळावे. वाहनांचे नंबर 3,6, 9, 12, 21, 24, 45 इत्यादी असतील तर चांगले.

मुलांक 7 - ह्या लोकांना हिरवा, पिवळा, पांढरा किंवा या रंगांच्या जवळपासचे रंग घ्यायला पाहिजे. वाहनांचे नंबर 2, 4, 11, 41, 22, 29, 31 इत्यादी असतील तर फारच उत्तम.

मुलांक 8 - या लोकांनी डार्क ग्रे, काळा, डार्क हिरवा आणि पर्पल रंगांचे वाहन खरेदी केले पाहिजे. वाहनांचे नंबर 4, 8 आणि 9 अंक सोडून कुठलेही अंक घेऊ शकता. तरीपण 1, 10, 19, 28 अंक यांच्यासाठी चांगले राहतील.

मुलांक 9 - यांना लाल आणि पिंक रंगांचे सर्वच शेड्स फायदेशीर ठरतात. वाहनांचे नंबर 3,6, 9,12,15, 24, 21 इत्यादी घेतले चांगले.

वेबदुनिया वर वाचा