व्यक्तिविशेष : पं. हृदनाथ मंगेशकर

WD
तरुण पिढीचे लाडके, प्रोगशील संगीतकार पं. हृदनाथ ङ्कंगेशकर यांचा आज जन्मदिन. त्यांचे पिता गायक दीनानाथ यांच्याकडून त्यांना संगीतकलेचा वारसा मिळाला. पुढे अमीरखाँ साहेबांसारख्या श्रेष्ठ शास्त्रीय गायकाचा त्यांनी गंडा बांधला. छ. शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कडवी निष्ठा असणारा, अनेक भाषा अवगत असणारा आणि सदोदित वाचनात रमणारा हा संगीतकार. आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगणारा हा संगीतकार.

साहसी प्रोगशीलता, नव्या वाटा धुंडाळणारी प्रायोगिकता, मनाला आल्हाद देणारी अनपेक्षित स्वररचना ही हृदनाथांची वैशिष्टय़े. गीतात ‘दर्या’ आणि ‘लाटा’ या शब्दाची अर्थपूर्ण पुनरुक्ती करायला लावून मराठीत कोळीगीते आणणारा हा कलावंत. नामवंत कवींच्या कवितांना त्यांनी चाली दिल्या. व्यासंग आणि प्रोगशीलतेच्या बळावर ‘जैत रे जैत’ मधील गीते गाजली. ना. धों. महानोरांप्रमाणेच सुरेश भट्ट, ग्रेस, आरती प्रभूंच्या कविता त्यांनी स्वरबध्द केल्या.

वेबदुनिया वर वाचा