7 रोशन व्हिला : चि‍त्रपट परीक्षण

गुरूवार, 23 ऑक्टोबर 2014 (15:44 IST)
निर्माता : अभिजित प्रभाकर भोसले

दिग्दर्शक : अक्षय दत्त

संगीत : अविनाश-विश्वजित

कथा-पटकथा-संवाद : श्रीनिवास भणगे

कलाकार : प्रसाद ओंक, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्रदीप वेलणकर, सविता मालपेकर


मराठी चित्रपटसृष्टीत  सध्या नवेनवे प्रयोग होत असून नवीन सस्पेन्स थ्रिलर ठरणारा  ''७, रोशन व्हिला'' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. '' ७, रोशन व्हिला '' ची उत्कंठा वाढविणारी कथा श्रीनिवास भणगे यांची असून पटकथा आणि संवादही त्यांचेच आहेत. अभिजित प्रभाकर भोसले यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय दत्त यांनी केले आहे. महेश अणे यांनी छायांकन केले असून संकलन भक्ती मायाळू यांचे आहे. या चित्रपटात प्रसाद ओंक, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्रदीप वेलणकर, सविता मालपेकर आदींच्या भूमिका आहेत.

या चित्रपटात तेजस्विनी एका श्रीमंत फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाची मुलगी असते, तिचे लग्न एका मध्यमवर्गीय प्रसाद नावाच्या मुलाशी होते आणि तो त्यांच्या घरी घरजावईबनून आपल्या सासर्‍याच्या कंपनीला संभाळायला लागतो. तेजस्विनीला वारंवार भास होतात आणि त्या आजाराचे तिला औषधे सुरू असतात. या दरम्यान प्रसाद तिला सांगत असतो की तू मानसिकरित्या अस्थिर आहे, त्यामुळे त्या दोघांमध्ये खटपटी होत राहतात. प्रसादचे एका मुलीशीअफेअर असल्यामुळे कथेत प्रेमाचा त्रिकोण येतो. कथेत नवीन वळण येतं जेव्हा तेजस्विनी प्रसादचा सूड घेण्याच्या उद्देशाने नवीन कल्पनांचा उपयोग करते.
http://bit.ly/7RoshanVilla-Tix

या चित्रपटात मानसिक अस्थिरता, प्रेम त्रिकोण, सूड आणि खूनासारख्या थीम बरोबरच एक रहस्यमय रोमांच आहे. भीती, थरार, उत्कंठा यांचा खिळवून ठेवणारा अनुभव घ्यायचा असेल तर या रहस्यपटाला चित्रपटगृहात जाऊन पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

रेटिंग : 2.5/5

वेबदुनिया वर वाचा