ढोल ताशे : चित्रपट परीक्षण

सोमवार, 6 जुलै 2015 (12:18 IST)
‘ढोल ताशे’ हा आपल्या मनात घुमणारा तो नाद उत्सवांच्या प्रसंगात आपल्यासोबत असणारा ढोलताशे पथकांच्या एकूण व्यवसायाचा. त्याबद्दलच्या पॅशनचा.. पथकांच्या उलाढालीचा ऊहापोह करणारा सिनेमा म्हणून ‘ढोल ताशे’ कडे पाहिलं जातं. या सिनेमात ढोलताशांच्या पार्श्वभूमीवर चालणारं राजकारण अन् त्याचा व्यापक अर्थाने होणारा परिणाम म्हणून हा सिनेमा आपलं वेगळेपण अधोरेखित करतो. माहितीपट अन् सिनेमा या सीमारेषेवर असणारा सिनेमा गोष्ट मांडू पाहतो.
 
अमेय कारखानीस म्हणजे अभिजित खांडकेकर अन् गोजिरी गुप्ते म्हणजे ह्रषिता भट या दोघांच्या लव्हस्टोरीने सुरू होणारा सिनेमा.. त्याच्या आयुष्यात ढोलताशे येतात.. ते त्याच्या मित्राच्या ढोलपथकामुळे. आयटी क्षेत्रातील मंदीच्या सावटामध्ये नोकरीवर कुर्‍हाड पडल्यावर अमेय या क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर मित्राच्या पथकाला स्पॉन्सरशिप मिळवून देतो. त्यामध्ये त्याच्या जगण्याला कशी कलाटणी मिळते. कारण जितेंद्र जोशी पुढारी असलेल्या युवा आघाडी या राजकीय पक्षातर्फे आयोजित एका ढोलताशे स्पर्धेत त्यांचं ढोलपथक सहभागी होतं अन् त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावतात. त्यानंतर ध्वनी प्रदूषणामुळे कारवाई करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते, मात्र त्यावेळी अभिजीत खांडकेकर या स्पर्धेत नियमांचं उल्लंघन झालं नाही. हे कायदेशीररीत्या पटवून देतो अन् त्यावेळी हा युवक नवनिर्माणाची ताकद घेऊन प्रवाहाच्या विरोधात उभं राहण्याची ताकद घेऊन आला आहे, याची जाणीव जितेंद्र जोशी या पक्षप्रमुखाला होते. मग तो अभिजीत खांडकेकरला आपल्या पक्षात घेऊन राज्यव्यापी ढोलताशे पथक संघटना बांधतो. त्या सगळ्यामध्ये कशाप्रकारे एक कॉर्पोरेट जगतातला मुलगा राजकारणाकडे बघतो. त्यावेळी त्याच्या घरचे कसे रिअँक्ट होतात. त्याची गर्लफ्रेंड.. ज्यावेळी त्याची नोकरी गेल्यावर पाठीशी उभी राहते. ती पत्राका आहे. अशावेळी या राजकारणाच्या दलदलीत आपल्या आयुष्याचा साथीदार चाललाय.. त्यामुळे त्याला पाठिंबा का देत नाही. आईबाबांचं म्हणणं काय आहे, या सगळ्यामध्ये अभिजितने उभारलेल्या संघटनेचं नेमकं काय होतं. त्यामध्ये संघटनेतून खरंच ढोलताशे पथकांचा प्रश्न मिटतो का, नेमकं त्या सगळ्या गोष्टींकडे कशाप्रकारे पाहिलं जातं. हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा