कोकिळा व्रत 2024 कधी आहे? पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

बुधवार, 3 जुलै 2024 (17:14 IST)
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला कोकिला व्रत आरंभ होते आणि श्रावण पौर्णिमेला समाप्त होते. कोकिळा व्रत पाळल्याने विवाहित महिलांचे सुख आणि सौभाग्य वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचबरोबर भगवान शंकराच्या कृपेने अविवाहित मुलींचे लग्न लवकर होते. यासोबतच इच्छित वरही मिळतो.
 
शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, आषाढ पौर्णिमा तिथी 20 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:59 वाजता सुरू होईल. प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते. यासाठी 20 जुलै रोजी कोकिळा उपोषण करण्यात येणार आहे. महिला उपवास 20 जुलै रोजी कोकिळा उपवास करू शकतात. 21 जुलै रोजी दुपारी 1:49 वाजता पौर्णिमा संपेल.
 
कोकिळा व्रत कथा
शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते. शास्त्रानुसार भगवान शिवाचा विवाह दक्ष प्रजापतिची पुत्री सतीसोबत झाला होता. प्रजापति शिवाला पसंद करत नव्हते, हे समजत असूनही सतीने शिवबरोबर विवाह केला. यामुळे प्रजापति सतीवर नाराज झाले.
 
एकदी प्रजापतिने फार मोठ्या यज्ञाचे आयोजन केले, ज्यात सर्व देवी-देवतांना बोलावले परंतु शिव आणि सतीला आमंत्रण नाही दिले. सतीच्या मनात पित्याचा यज्ञ बघण्याची इच्छा झाली आणि ती शिवाकडे हट्ट करून यज्ञस्थळी पोहोचली.
 
त्यावेळी दक्षाने शिव आणि सतीचा फार अपमान केला. सती अपमान सहन करू शकली नाही आणि यज्ञ कुण्डात उडी मारून जळून गेली. यानंतर शिवाने दक्षचा यज्ञ नष्ट केला आणि हट्ट करून सती प्रजापतिच्या यज्ञात सामील झाली म्हणून तिला शाप दिला की तिने दहा वर्षापर्यंत कोकिळा बनून नंदनवनात रहायचे. यानंतर त्यांचा जन्म पर्वतराज हिमालय यांच्या घरी झाला. आणि तपस्या केल्यावर महादेवाशी विवाह झाले. म्हणून या व्रताचे खूप महत्तव आहे.
ALSO READ: श्री कोकिळा महात्म्य संपूर्ण अध्याय (1 ते 30)
कोकिळा व्रताच्या विषयात अशी मान्यता आहे कि ह्यामुळे सुयोग्य पतीची प्राप्ती होते. ज्या विवाहित स्त्रियां ह्या व्रताचे पालन करतात, त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. घरात वैभव आणी सुखाची भरभराट होते. ह्या व्रतास सौन्दर्य देणारे व्रत म्हणू्नही मानतात कारण ह्या व्रतात जड़ी-बूटी स्नानासाठी वापरण्याचा नियम आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती