घराचा करा स्वर्ग

तुमचे घर हे एकमात्र ठिकाण असे असते की जिथे आल्यानंतर तुमचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. आणि मनाला शांती मिळते. तुम्ही कुठेही असलात तरी तुमचे सर्व लक्ष घराकडेच लागलेले असते. काही चांगल्या गोष्टींचा समावेश करून आपल्या घराला अजून व्यवस्थित रूप देऊ शकता. 
 
सगळ्यात आधी घराला निसर्गानुरूप बनवा. याचा अर्थ निसर्गात असणार्‍या प्रत्येक घटकाचे संतुलन व्यवस्थित असायला हवे. म्हणजे भूमी, जल, जंगल, आग सगळ्याचेच संतुलन हवे. घरात पाण्याचे प्रतीक म्हणून एक्वेरीअम ठेवा किंवा निळे पडदे लावा. एक्वेरिअम ठेवल्याने घरात शांती राहते. आगीचे संतुलन योग्य रहावे यासाठी संध्याकाळी घरात दिवा अवश्य लावावा. 
 
जंगल दर्शविण्यासाठी इनडोअर प्लांट घरात ठेवा. लाकडी फर्निचर असले तरी चालते. झाडे-झुडपांमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती असते.
 
आपल्या घराच्या बेडरूममध्ये जास्त सामान ठेवू नये. सामान विखूरलेल्या अवस्थेत असले तर तणाव जाणवतो. बेडरूम शक्य तेवढी मोकळी ठेवा. बेडरूम घराच्या मागच्या बाजूला असेल तर उत्तम. 
 
तुमच्या घरात जास्त सामान असेल आणि त्यामुळे अडचण जाणवत असेल तर ते तीन भागात वाटा. एका भागात आवश्यक नसलेले सामान ठेवा. दुसर्‍या भागात नेहमी उपयोगात येणारे सामान ठेवा. तिसर्‍या भागात कामाचा नसलेला पण कोणाच्या तरी कामात येऊ शकेल असे सामान ठेवा. 
 
भाग एकमध्ये ठेवलेले सामान लगेच घराच्या बाहेर काढा. दुसर्‍या भागातील सामान व्यवस्थित रचून ठेवा. तिसर्‍या भागातील सामान आवश्यकता असेल त्यांना दान करून टाका. 
 
मनाच्या शांतीसाठी आजूबाजूला लहानशी का असेना एक बाग तयार करा. बाहेरून थकून-भागून आल्यावर बगिच्याकडे लक्ष दिल्यास तणाव/थकवा पळून जातो.
 
या टिप्सचा वापर करून तुम्हीही तुमच्या घराला स्वर्गाचे रूप देऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा