जमाना मिशा आणि दाढीचा

दोस्तांनो, सध्याक्लीन शेव्ह लूक थोडा बाजूला पडलाय. फॅशनजगतात बोलबाला आहे तो मिशा आणि क्रॉप्ड हेअरस्टाईलचा. डॅशिंग लूकसाठी थोड्या मिशा आणि क्रॉप्ड हेअरस्टाईल ठेवण्यावर युथचा भर आहे. मॅस्क्युलाईन लूकसाठी मिशा आणि कूल लूकसाठी क्रॉप्ड हेअरस्टाईलला पसंती मिळतेय. विराट कोहली आणि गौतम गुलाटीसारखा लूक सध्या कॉलेजजगतात इन आहे. 
 
* क्रॉप्ड हेअरस्टाईलमध्ये दोन्ही बाजूंनी शॉर्ट साईझ झीरो हेअरकट करून मध्यला भागात क्रॉपिंग केलं जातं. हा लूक स्टाईल स्टेटमेंट ठरताना दिसतोय. ब्लेडचा वापर करून केसांमध्ये रेषेचा आकार दिला जातोय. यासोबतच गोलाकार किंवा पॉईंटेड मिशा ठेवल्या जात आहेत.
* बॉलिवूड सेलिब्रिटीजनी मिशांचा ट्रेंड हिट केलाय. वरुण धनव आणि रणवीर सिंग यांनी युथमध्ये मुश्ततॅच लूक लोकप्रिय केलाय. मिशांमध्ये हे दोघं डॅशिंग दिसतात. म्हणूनच तरुणाई अशा मॅनली लूकच्या प्रेमात आहे. वरुण धवनने 'बदलापूर'मध्ये कॅरी केलेला लूक युथला भावलाय. मिशांबरोबर शॉर्ट, ट्रीम केलेली दाढी ठेवली जातेय. 
* साईड शेव्ह करून घनदाट मिशा असलेला मॅसी लूक तरुणाईच्या पसंतीला उतरला आहे. काहीजण क्लीन शेव्ह करून गोलाकार मिशा ठेवायला प्राधान्य देत आहेत. ऑफिसर स्टाईल मिशांनाही युथची पसंती आहे. 
 
* कायम क्लीन शेव्हमध्ये दिसणारा शाहरुख खान स्टायलिश हॉर्स शेप्ड मिशांमध्ये दिसतोय. फॅशन असो वा नसो, अनिल कपूर कायमच मिशा ठेवतो. 
त्यांच्यासारख्या जेंटलमन स्टाईल मिशाही रॉकींग दिसतात. अजय देवगणही मिशांसोबत बरेच प्रयोग करतो. तुम्हालाही तुमच्या चेहर्‍याला सूट होणारी सेलिब्रिटी स्टाईल कॅरी करता येईल. 'वजीर' या चित्रपटात इरफान खाननेही मिशा ठेवल्या आहेत. भरपूर दाढी आणि डोक्यावर भरपूर हिरवळ ठेवण्याचा ट्रेंडही हिट ठरतोय. मग तुम्ही कोणता ट्रेंड कॅरी करणार? 

वेबदुनिया वर वाचा