पावसाळ्यात ट्रेंडी राहण्यासाठी

बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (14:51 IST)
पावसाळा सुरू आहे. या ऋतूत आरामदायी राहण्यासोबतच ट्रेंडी राहायचे असेल तर कपडे, मेकअप आणि अ‍ॅक्सेसरीज या सर्वच गोष्टींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मान्सून ट्रेंडी राहण्यासाठी जाणून घेऊया काही खास ट्रिक्स ...
 
फॅब्रिक ..........................
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या ऋतूत उजळ आणि बोल्ड रंग वापरावे. नियॉन, शिफॉन, जॉर्जेट, हलके सुती आणि नायलॉनचे फॅब्रिक्स स्टायलिश वाटतात. हे फॅब्रिक्स पावसात भिजल्यानंतर लवकर कोरडे होतात. या ऋतूत जाड सुती आणि खादीचे कपडे वापरणे टाळावे.
 
मेकअप ..........................
या ऋतूत हलका मेकअप करावा. ओठांवर हलक्या रंगाच्या शेड्‌सची लिपस्टिक ट्राय करावी. डोळ्यांना विविध उजळ रंगाचे आय लायनर शोभून दिसतील. जी सौंदर्यप्रसाधने तुम्ही वापराल ती वॉटरप्रूफ   असल्याची खात्री करून घ्या.
 
फूटवेअर.......................... 
या ऋतूत पावसातटिकतील असे गमबुट्‌स, जेली फ्लॅट आणि फ्लिप- फ्लॉप वापरा. हाय हिल्स आणि सँडल वापरणे टाळावे.
 
हेअर स्टाइल ........................
फिशटेल, साइटबँड किंवा हाय पोनीटेल ट्राय करा. वेगळ्या हेअर स्टाइल करून घ्या. पावसाळ्यात लहान केस आकर्षक वाटतात.
 
कपडे ..........................
शर्ट, केप्री, स्कट्‌र्स, मिडी, शॉट्‌र्स, वन-पीस ड्रेसची शॉपिंग करा. या कपड्यांवर बोल्ड प्रिंट, अ‍ॅनिल प्रिंट आणि फ्लोरल प्रिंट पावसाळ्यात ट्रेंडी वाटतात.
 
अ‍ॅक्सेसरीज .........................
या आल्हाददायी वातावरणात रंगीबेरंगी आणि पारदर्शक छत्री, रेनकोट वापरा. वाटरप्रूफ हँडबॅग्समध्येही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती