मुलांना शॉपिंगमधलं काही कळत नाही. शॉपिंग हा मुलांचा प्रांतच नाही. त्यांना करायचं तरी काय असतं? शर्ट पँट घातली की झाले तयार, असे शब्द तमाम पोरांच्या कानी नेहमीच पडत असतात. पण पोरंही काही कमी स्टायलिश नसतात. शर्ट, पँट, कानात एखादी भिकबाळी, फंडू हेअरस्टाइल असा लूक कॅरी करण्यासाठी मेहनत करावी लागते.
पण स्टायलिश दिसण्यासाठी पोरांना काय काय ऐकावं लागतं आणि काय काय झेलावं. लागतं, किती दुकानं पालथी घालावी लागतात, स्टाइल मॅगझिन्सची किती पानं उलटावी लागतात हे त्या पोरींना कसं कळणार? खरंय मित्रांनो, आजच्या स्टायलिस्ट जमान्यात आपली आयडेंटिटी जपण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. पण अनेकदा इमर्जन्सी येते. म्हणजे एखादा समारंभ, वीकेंड पिकनिक, मिटींग ठरते आणि घालायचं काय, हा प्रश्न समोर उभा राहतो. अशा वेळी तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही गोष्टी असल्या तर पंचाइत होत नाही.
लोफर्स - पादत्राणांमध्ये लोफर्सची सध्या चांगलीच चलती आहे. त्यामुळे एखादी लोफर्सची जोडी तुमच्याकडे असू द्या. शॉर्ट, डेनिम, फॉर्मल्स कशावरही लोफर्स चालून जातात.
घड्याळ - छानसं घड्याळही तुमच्या ठेवणीत असू द्या.
ब्लेझर - डार्क ब्लॅक किंवा ब्लू ब्लँझर कोणत्याही स्पेशल ओकेजनसाठी तुमच्याकडे हवाच.