सौंदर्य प्रसाधन एक कला

ND
फॅशनच्या जमान्यात प्रत्येक क्षण नव्या रूपात आपल्या समोर येऊन उभा राहतो. आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला न विचारता आपल्या डोळ्यासमोर ठेवले जाते. एवढे 'मार्केट फास्ट' झाले आहे. नववधूना साडी नेसण्यात अडचण येते म्हणून त्यांच्यासाठी रेडिमेड दोन्ही बाजूंनी शिलाई मारलेली साडी तर नोकरी करणार्‍या तरूणींकरीता जीन्स व कुर्ता हा पर्याय साडीच्या बदल्यात ठेवला आहे.

पावसाळ्यात मेकअप धुतला जातो म्हणून आधुनिक वाटरप्रूफ मेकअपचा जमाना आला आहे. म्हणजे तुम्हाला आवडणारी व तुमच्या सोयीची गोष्ट केवळ तुमच्यासाठी तयार केली जात आहे.

आता नॅचरल मेकअपचा नवीन ट्रेंड आला आहे. यात मेकअप केल्यानंतरही समोरच्याला वाटेल तुम्ही मेकअप केला नसून निसर्गत: सुंदर आहात.

ND
सौंदर्य प्रसाधन ही एक कला आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वातील कमतरता भरून काढता येते. एक जमाना असा होता, जेव्हा महिलांकडे टाल्कम पावडरव्यतिरिक्त दुसरे सौंदर्य प्रसाधन नव्हते. हळद व हरबर्‍याच्या डाळीचे पीठ एकत्र करून चेहर्‍यावर लावले जात होते. घरीच तयार केलेले काजळ डोळ्यात भरून सौंदर्यात भर घातली जात होती. परंतु, बदलत्या काळानुसार सौंदर्याची परिभाषा बदलली असून बाजारात सौंदर्य प्रसाधनांची गर्दी झालेली दिसून येते.

ज्या स्त्रिया निसर्गत: सुंदर आहेत. सौंदर्य प्रसाधने वापरत नाहीत, अशा महिलांकरीता नवीन प्रॉडक्ट्‍स लॉंच केली आहे. ही सौंदर्य प्रसाधने नैसर्गिक आहेत. त्यात फाउंडेशनपासून लिपस्टिक व नेल पॉलिशपर्यंतच्या प्रसाधनांचा समावेश आहे.

ND
यात सर्वात आधी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या त्वचेला मिळत्याजुळत्या रंग छटा निवडल्या पाहिजे. चेहर्‍यासाठी दोन प्रकारच्या छटा उपयोगात आणू शकतो. फिकट रंगछटा वापरल्याने चेहर्‍यावरील छिद्रे झाकली न जाता ‍त्यांना सरंक्षण होते. तर गडद छटा वापरल्याने गाल व नाकाचा वर आलेला भाग दाबण्यास मदत होते.

चेहर्‍यावरील सौंदर्यलेपन जास्त काळ टिकून राहण्यासाठी ड्यूल फिनिश पावडरचा उपयोग केला जातो.

अशाच प्रकारे ओठ व डोळे यांचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. डोळ्यांना अधिक सुंदर करण्यासाठी भुवयांवर सोनेरी पेन्सिलने हलक्याशा शेड दिल्या पाहिजेत.

फॅशन म्हणून आपण याकडे पाहत असलात तरी ती आज काही महिलांची गरज देखील झाली आहे. त्यामुळे काळाच्या प्रवाहात राहायचे असेल तर त्याच्या सोबतच चालले पाहिजे.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा