थंडीचा कडाका वाढू लागताच त्वचाही कोरडी व शुष्क होते. त्याचवेळी ती निस्तेजही दिसू लागते, अशावेळी तिला मुलायम ठेवण्याचे हे काही सोपे उपाय :-
* हवेतल्या ओलाव्याच्या अभावाने त्वचा कोरडी होते. विशेषत: हात, पाय व ओठ. अशावेळी आंघोळ केल्यावर लगेच मॉयश्चराइझर लावल्यास त्वचेचा ओलावा टिकवता येतो.
* हातावर रात्री झोपताना साय लावावी.
* ज्यांना साय सुट होत नाही त्यांनी लिंबूरसात ग्लिसरीन व गुलाबपाणी मिसळुन रात्री झोपताना हात व पायांवर लावावे, त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
* आंघोळ करण्यापूर्वी डाळीच्या पीठात थोडे दही व हळद चिमूटभर (आंबेहळद असल्यास उत्तम) एकत्र करून त्याची पेस्ट बनवावी व त्याने आंघोळ करावी. साबणाची आवश्यकता नही कारण थोड्या जाडसर पिठाने शरीर चांगल्या प्रकारे साफ होते.
* आंघोळीसाठी फार गरम पाणी वापरू नये व आंघोळीनंतर लोगच बॉडी लोशन लावावे.
* रात्री झोपण्यापूर्वी पायांना कोमट पाण्यात भिजवून ठेवा. मग त्यावर कोणतेही क्रीम किंवा मॉइश्युराईझर लावावे त्यामुळे टाचेवरचील त्वचा मृदु व मुलायम राहते.
* आंघोळीपूर्वी लिंबू व हळद युक्त क्रीमने सुद्धा पावलांना, टाचांना मसाज करता येतो.
* 1/2 बादली कोमट पाण्यात 1 मोठा चमचा मध मिसळा व आंघोळीनंतर या पाण्याने रिंग करा याने थकवा दूर होतो व त्वचाही मृदू होते.
* आंघोळीपूर्वी पंचामृत लावणेही लाभदायक ठरते.
* मिठाच्या कोमट पाण्याने हातपाय शेकल्यास थकवा कमी होतो व त्वचाही कोमल राहते.